हॅलो माझ्याशी कुणी बोलता का? 

download.jpg
download.jpg

नागपूर : हॅलो... मी सुयश... माझ्याशी कुणी बोलेल का? तुम्हाला वेळ आहे का? माझे आई-बाबा बिझी असतात. घरात मी एकटाच आहे. मला खूप खूप बोलायचं आहे. माझ्या अपार्टमेंटमधील वॉचमन मला त्रास देतो. मला एकट्याला बोलावून स्पर्श करतो. नागपूरच्या उच्चभ्रू वस्तीतील हा "कॉल चाइल्ड लाइनच्या हेल्पलाईन सेंटरवर येऊन धडकला आणि संस्थेतील स्वयंसेवकांनी तासाभरात दहा वर्षाच्या सुयशची बंद घरातून सुटका केली.
 
समाजातील निराधार, घर व समाजातील शोषित, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेले, निवारा शोधणारे, बाल कामगार, हरवलेली व भावनिक आधार शोधणारी बालके यांच्यासाठी काम करणाऱ्या चाइल्ड लाइन संस्थेकडे गत वर्षभरात 1340 कॉल आलेत. यात शहर चाइल्ड लाइन चमूकडे एकूण 832 आणि रेल्वे चाइल्ड लाइनकडे 508 कॉल रेकार्ड आहेत. बालकांच्या संरक्षण व अधिकारासाठी चाइल्ड लाईन कार्यप्रणाली सुरू केली. राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यातून 1098 वर कॉल केल्यास तो प्रथम मुंबईतील कॉल सेंटरला जोडला जातो. सेंटरला माहिती घेतल्यानंतर कॉल करणाऱ्याचे नाव, क्रमांक संबंधित जिल्ह्याच्या युनिटला कळवले जाते. संबंधित युनिटचे स्वयंसेवक तासभरात समस्याग्रस्त बालकापर्यंत पोहोचतात. 

चाइल्ड लाइनकडे आलेले कॉल 
हरवलेली मुले - 31 
घर सोडून गेलेले मुले - 242 
सापडलेली मुले - 110 
समुपदेशनासाठी आलेले कॉल - 73 
लैंगिग छळ - 67 
पालकांचा मदतीसाठी कॉल - 29 
शैक्षणिक, आरोग्यविषयक मदत - 350 

...तर 1098 ला कॉल करा 
अनाथ, निराधार व आजारी मूल दिसले 
भरकटलेले बालक त्याच्या पालकांकडे जाऊ इच्छिते 
लैंगिक शोषणास बळी पडलेले बालक आढळल्यास 
एखादे मूल कौटुंबिक कलहात सापडले असल्यास 
आपणास बालकांसाठी मदत देण्याची इच्छा असेल 
बाल कामगार आढळून आल्यास 
बालकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी 
बाल कामगार आढळून आल्यास. 

घरी योग्य वातावरण मिळत नसेल तर बालके बाहेर आधार शोधतात. यातून अत्याचार, छळ, लैंगिक शोषण अशी प्रकरणे आमच्याकडे येतात. चाइल्ड लाइनच्या कामात लोकसहभाग वाढावा. कारण समाजात बालकांच्या हक्कांबाबत जनजागृती झाली तरच बालकांबाबतच्या अनुचित घटनांना आळा बसेल. 
- पायल चामटकर, जिल्हा समन्वयक, चाइल्ड लाइन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com