दर्यापुरात आढळला दुर्मिळ गजरा साप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

अमरावती - देशभरात अत्यल्प नोंद असलेला गजरा जातीचा साप जिल्ह्यातील दर्यापूर येथे आढळला. दर्यापूरच्या डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनी येथील शिवम रायपुरे यांच्या घरी साप निघाल्याची माहिती मिळताच सर्पमित्र विशाल ठाकूर व राज वानखडे त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी थोडा वेळ शोध घेतल्यानंतर साप आढळला. मात्र, दर्यापूर तालुक्‍यात अशा प्रकारचा साप यापूर्वी न आढळल्याने सर्पमित्रांनी याची माहिती व फोटो अमरावती येथील वाइल्डलाइफ ॲनिमल्स स्टडी ॲण्ड रिसर्च सेंटरकडे पाठविली.

अमरावती - देशभरात अत्यल्प नोंद असलेला गजरा जातीचा साप जिल्ह्यातील दर्यापूर येथे आढळला. दर्यापूरच्या डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनी येथील शिवम रायपुरे यांच्या घरी साप निघाल्याची माहिती मिळताच सर्पमित्र विशाल ठाकूर व राज वानखडे त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी थोडा वेळ शोध घेतल्यानंतर साप आढळला. मात्र, दर्यापूर तालुक्‍यात अशा प्रकारचा साप यापूर्वी न आढळल्याने सर्पमित्रांनी याची माहिती व फोटो अमरावती येथील वाइल्डलाइफ ॲनिमल्स स्टडी ॲण्ड रिसर्च सेंटरकडे पाठविली. मिळालेली माहिती आणि छायाचित्राचा अभ्यास केल्यानंतर हा साप मृदू साप म्हणजेच गजरा प्रजातीचा असल्याची पुष्टी वसा ग्रुपचे अध्यक्ष व सर्पमित्र शुभम सायंके यांच्याकडून करण्यात आली. सायंके यांनी सांगितले की, हा साप बिनविषारी त्याची सर्वाधिक लांबी २२ इंच नोंदली गेली.

टॅग्स