अमरावतीत डेंगीचे थैमान

सुधीर भारती
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

अमरावती - शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंगीचा उद्रेक वाढला असून आतापर्यंत सहा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागातसुद्धा साथीचे आजार बळावल्याने आरोग्ययंत्रणेची धावाधाव सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, स्वाइन फ्लूचाही एक नवीन रुग्ण आढळला.  

सध्या वातावरणात उष्मा वाढला असून काही ठिकाणी पुन्हा कुलर बाहेर निघाले आहेत. परंतु, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी बंद कुलरच्या टाक्‍यांमध्ये अद्याप साचूनच आहे. या पाण्यातच डेंगीचे डास आढळतात, त्यातूनच आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या डासांपासून होणाऱ्या डेंगीमुळे अमरावतीकर चिंताग्रस्त झाले आहेत. 

या आठवड्यातच सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर शहरातील रुक्‍मिणीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार  सुरू आहेत. शहरात स्वाइन फ्लूचासुद्धा एक नवीन रुग्ण आढळला असून त्याच्यावरदेखील  खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ग्रामीण भागाचा विचार करता वरुड तसेच इतर काही तालुक्‍यांमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्यकेंद्र, खासगी रुग्णालये ‘हाउसफुल्ल’ झालेली आहेत. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.    

नागरिकांनी घ्यावी खबरदारी 
डेंगीचा डास स्वच्छ पाण्यात राहत असल्याने नागरिकांनी शक्‍यतोवर घरातील कूलरच्या टाक्‍या, भांडी कोरड्या ठेवण्यावर भर दिला पाहिजे. आजार होऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेची असून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला जावा. तसेच सर्दी, खोकला, ताप असलेल्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम यांनी केले.

टॅग्स