दोन चिमुकल्यांसह वडिलांची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

धामणगावगढी येथील सदानंद दहीकर हे आपल्या दोन बंधू व आईसमवेत येथे रहात होते. मागील एक वर्षापासून त्यांची पत्नी कौटुंबिक कलहामुळे माहेरी राहत होती. त्यामुळे मुलांचा सांभाळ सदानंदची आईच करीत होती.

अचलपूर (जि. अमरावती) : दोन चिमुकल्या मुलांसोबत वडिलांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.4) तालुक्‍यातील धामणगावगढी येथे उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव सदानंद दहीकर (वय 35) असे असून, गौरव (वय 10) व प्रिया (वय चार) अशी चिमुकल्यांची नावे आहेत. 

धामणगावगढी येथील सदानंद दहीकर हे आपल्या दोन बंधू व आईसमवेत येथे रहात होते. मागील एक वर्षापासून त्यांची पत्नी कौटुंबिक कलहामुळे माहेरी राहत होती. त्यामुळे मुलांचा सांभाळ सदानंदची आईच करीत होती. सदानंदने अनेकदा पत्नीला घरी आणण्याचा प्रयत्न केला; मात्र पत्नीने यायला नकार दिला. त्या निराशेतूनच सदानंदने मुलांसह विहिरीत उडी घेऊन जगाचा निरोप घेतला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. 

धामणगावगढी गावालाच लागूनच असलेल्या दीपक अग्रवाल यांच्या शेतात काही शेतमजूर शनिवारी दुपारी ओलित करीत होते. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. याची माहिती त्यांनी शेतमालकास दिली. त्यांनी नंतर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांची ओळख पटली. 
 

Web Title: Amravati news father killed sons