मोबाईल ऍपने मानवी हस्तक्षेप हद्दपार 

Mahavitran
Mahavitran

अमरावती : महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. ग्राहकांच्या सोयीसाठी विकसित केलेल्या मोबाईल ऍपमुळे वेळेत वीजबिल मिळण्यासोबतच प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप दूर झाला आहे. 

महावितरणचे मोबाईल ऍप डाउनलोड केलेल्या सर्वच ग्राहकांना आता क्षुल्लक कारणांसाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. वीजबिल भरण्यापासून ते विजेसंबंधीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी या ऍपचा उपयोग होत आहे. ग्राहकांना सर्व सेवा घरबसल्या देण्याचा प्रयत्न होत आहे. वीजदेयकाचा भरणा करण्यासाठी केंद्रांवर रांगा लावण्याची गरज राहिलेली नाही. या मोबाईल ऍपमुळे ग्राहकांना अचूक वीजबिल मिळत असल्याचा दावा कंपनीतर्फे केला जात आहे. 

या ऍपची सेवा 24 तास उपलब्ध आहे. जर एखाद्या ग्राहकाकडील वाचन घेण्यास वाचक आलेला नसल्यास ग्राहक स्वतः ते वाचन या ऍपवर पाठवू शकतात. या सुविधेमुळे देयकात अचूकता आल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. महावितरणने विकसित केलेले ऍप गुगल प्ले-स्टोअर, ऍपल प्ले-स्टोअर, विंडोज स्टोअर तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर ऍप या नावाने उपलब्ध आहे. 

ऍपवर आहेत आठ सुविधा 
मोबाईल क्रमांक नोंदविणे, देयकाची माहिती, ऑनलाइन देयक, देयक भरण्याची सुविधा, देयक अदा केल्याचा तपशील, रीडिंग सबमिट करण्याची सुविधा, एका मोबाईलवरून एकापेक्षा जास्त ग्राहकांची देयक अदा करण्याची सुविधा, तक्रारी नोंदविणे इत्यादी प्रकारच्या सुविधा ऍपद्वारे दिल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com