मेळघाटात गळ्यावर कोयत्याने वार करुन एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

काथोटे हे घराबाहेर झोपले होते. तेव्हा त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने अचानक हल्ला केला.

अमरावती : मेळघाटच्या धारणी तालुक्यातील धुलघाट रोड परिसरात एका  व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. काल (सोमवार) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबतची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रामा काथोटे असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काथोटे हे घराबाहेर झोपले होते. तेव्हा त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने अचानक हल्ला केला.

काथोटे यांच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन त्यांचा खून करण्यात आला. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, खुनामागचे नेमके कारण, तसेच आरोपीबद्दल अद्याप कोणताच सुगावा लागलेला नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय?
मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे
#स्पर्धापरीक्षा - GST​
दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले​
कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक​
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या​
गरोदर लेकीला मारणाऱ्या नराधम बापाला अखेर फाशी

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

04.06 PM

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

04.06 PM

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

04.06 PM