आमदार यशोमती ठाकूर थोडक्‍यात बचावल्या

Mla-Yashomati-Thakur
Mla-Yashomati-Thakur

अमरावती - मेघालयमध्ये कॉंग्रेसच्या प्रचारासाठी प्रभारी म्हणून गेलेल्या तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ऍड. यशोमती ठाकूर अतिरेकी हल्ल्यातून थोडक्‍यात बचावल्या.

मेघालयच्या गारोहिल भागात ही घटना रविवारी (ता. 18) रात्री बाराच्या सुमारास घडली.

आमदार यशोमती ठाकूर, सी. पी. जोशी, अनिल थॉमस व अन्य कॉंग्रेस नेते मेघालयातील गारोहिल भागात प्रचारासाठी गेले होते. प्रचार आटोपून रात्री वाहनाने परतताना अतिरेक्‍यांनी त्यांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत मतदारसंघातील अन्य पक्षाचा एक उमेदवार गंभीर जखमी झाला, अशी माहिती रात्री उशिरा मिळाल्याचे तिवसा नगरपंचायतचे उपाध्यक्ष आणि कॉंग्रेस नेते वैभव वानखडे यांनी सांगितले.

आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे पक्षाने नुकतीच निवडणूक समन्वयक म्हणून मेघालय राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. त्यासाठी काही दिवसांपासून त्या मेघालयात आहेत. आज, सोमवारी घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली. या संदर्भात आमदार ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com