अंगणवाड्यांत मदतनिसांची पदे रिक्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नागपूर - राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत शहरी भागात चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीमधील सेविकांची अकरा तर मदतनिसांची दोनशेवर पदे रिक्त आहेत. मदतनिसांअभावी अंगणवाडींची दुर्दशा झाली.

नागपूर - राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत शहरी भागात चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीमधील सेविकांची अकरा तर मदतनिसांची दोनशेवर पदे रिक्त आहेत. मदतनिसांअभावी अंगणवाडींची दुर्दशा झाली.

अंगणवाडीतील साफसफाईपासून तर आहार वितरणाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. मदतनिसांची पदे भरण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही हालचाली शासनाकडून होत नसल्याची माहिती पुढे आली. महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्पाअंतर्गत नागपूर शहरी भागात 981 अंगणवाड्या चालविल्या जातात. शहरातील हनुमानगर विभागात दोन, मानसेवा विभाग, ग्रेट नागरोड (घाटरोड), रेशीमबाग, वाडी कामठी अशा विभागवार अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाडी केंद्रात सेविकेची 11 पदे रिक्त असल्याने आहार वितरणात अडचण निर्माण होते. यामुळे बाजूच्या अंगणवाडीतील सेविका आल्यानंतरच आहार वितरित केला जातो. शहरी भागातील अंगणवाडीत मदतनिसांचा अभाव दिसतो. अनेक अंगणवाड्यात सेविकाच सारी कामे करतात. बालविकास प्रकल्प अधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे, बचतगटातून आलेला आहार घेण्यासाठी भांडी धुण्याची कामेदेखील सेविकांनाच करावी लागत असल्याची खंत अनेक सेविकांनी व्यक्त केली.

अंगणवाडी मदतनिसांची रिक्त पदे
-हनुमाननगर-1 -40
-हनुमाननगर-2 -14
-मानवसेवानगर -44
-रेशीमबाग -30
-घाट रोड -19
-वाडी-कामठी -08

विदर्भ

काँग्रेस भवनात गर्दी - मनपा निवडणुकीनंतर प्रथमच एका मंचावर नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवाचे एकमेकांवर खापर...

10.12 AM

कर्जबाजारीपणासह विविध कारणांमुळे ओढवली परिस्थिती नागपूर - शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ज्याच्या मदतीने...

10.12 AM

नागपूर - विदर्भासह धान उत्पादक क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादन प्रभावित झाले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत...

10.12 AM