अनिल गोटे-अबू आझमींमध्ये चकमक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

नागपूर - भाजपचे सदस्य अनिल गोटे व समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यात शुक्रवारी विधानसभेत झाकिर नाईक मुद्यावरून खडाजंगी झाली. गुरुवारी (ता. 8) सभागृहाच्या बाहेर याच मुद्यावरून या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली होती.

नागपूर - भाजपचे सदस्य अनिल गोटे व समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यात शुक्रवारी विधानसभेत झाकिर नाईक मुद्यावरून खडाजंगी झाली. गुरुवारी (ता. 8) सभागृहाच्या बाहेर याच मुद्यावरून या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली होती.

अनिल गोटे यांनी औचित्याचा मुद्या उपस्थित करून झाकिर नाईक यांच्या संस्थेचा विषय काढला. झाकिर नाईक यांच्या संस्थेतर्फे दहशतवादाला प्रोत्साहन मिळत आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सामील झालेल्या दहशतवाद्यांनी झाकिर नाईक यांच्या प्रवचनाचा परिणाम झाल्याची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर बांगलादेशमधील दहशतवादी कृत्यामध्ये सामील असलेल्यांना झाकिर नाईक यांच्या संस्थेतर्फे छात्रवृत्ती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या देशद्रोही कृत्यामध्ये सामील झालेल्यांचे समर्थन करणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्यात यावे, अशी मागणी गोटे यांनी केली.

या गोटेंच्या या वक्तव्याला अबू आझमी यांनी आक्षेप घेतला. या वेळी या दोन्ही सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करून दोन्ही सदस्यांना शांत केले.

विदर्भ

अकाेला : महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने शुक्रवारी (ता. १८) महापाैर विजय अग्रवाल यांच्यासह भाजप...

02.30 PM

नागपूर - धरमपेठेतील वाहनांच्या कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आज गुरुवारपासून ‘नो पार्किंग झोन’ अस्तित्वात आला. आज वाहतूक पोलिसांनी...

02.24 PM

३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश - ७३ हजार जागा रिक्त  नागपूर - ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश असलेली राज्यातील जवळपास...

02.24 PM