कार्यकर्ते फक्त शोभिवंत झाडे आहे का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला आहे. एका कार्यकर्त्याने आम्ही फक्त बागेतील शोभिवंत झाडे आहोत का? अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर टाकून आपल्या भावना मोकळ्या केल्या. यास भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी लाईक करून त्यांच्या मतांना समर्थनच दिले आहे.

नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला आहे. एका कार्यकर्त्याने आम्ही फक्त बागेतील शोभिवंत झाडे आहोत का? अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर टाकून आपल्या भावना मोकळ्या केल्या. यास भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी लाईक करून त्यांच्या मतांना समर्थनच दिले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत सुमारे चार हजार कार्यकर्त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. यापैकी काही जणांना उमेदवारी निश्‍चित असल्याचे आश्‍वासनसुद्धा देण्यात आले होते. मात्र, आदल्या रात्री अनेकांची नावे कापण्यात आली. यामुळे प्रचंड असंतोष उफाळून आला होता. काहींनी वाड्यासमोरच निदर्शने केली होती. काहींनी बंडखोरीचे अस्त्र उगारले होते. विशाखा जोशी, प्रसन्न पातूरकर, श्रीपाद रिसालदार, अनिल धावडे, गोपाल बोहरे यांनी थेट बंडाचे निशाण फडकावले. काहींनी शिवसेनेचा भगवा अंगावर घेतला. काही बंडखोरांना शांत करण्यात पक्षाला यश आले. याकरिता स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उमेदवारी मागे घ्यायच्या आदल्या रात्री शहरात फिरले. यापैकी काहींना स्वीकृत सदस्यांचे गाजर दाखविले होते. भाजपचे 108 सदस्य निवडून आल्याने एकूण चार स्वीकृत सदस्यांचा कोटा मिळाला आहे. मात्र, इच्छुकांची संख्या चाळीसच्या घरात असल्याने दीड महिना ही प्रक्रियाच लांबणीवर टाकली होती. परवा मुन्ना पोकुलवार, सुनील अग्रवाल, किशोर वानखेडे आणि निशांत गांधी यांची नावे भाजपने जाहीर करताच पुन्हा असंतोषाने उचल खाल्ली आहे. स्वीकृत सदस्यांसाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संजय ठाकरे, गुड्डू त्रिवेदी यांची नावे आघाडीवर होती. मुन्ना पोकुलवार भाजपचे सदस्यच नाहीत. त्यांचे पक्षात कुठलेच काम नाही असे असताना त्यांना उमेदवारी देण्याचे कारण काय?, सुनील अग्रवाल यांना आणखी कितीवेळा संधी देणार असेही कार्यकर्ते खासगीत बोलत आहे.

ठाकरेंची पोस्ट
राजकारणात कार्यकर्ते हे बागेतील शोभेच्या झाडासारखे वापरले जातात. ही झाडे वाजत गाजत लावली जातात. सुरुवातीची वाढ झपाट्याने व्हावी म्हणून खतपाणीही घालतात. परंतु, एकदा ती झाडे दोन तीन फुटांची झाली की मग मात्र दर महिना दोन महिन्यांनी त्यांना कापून त्याच उंचीवर ठेवले जाते. झाड मरू द्यायचे नाही, झाड वाळू द्यायचे नाही आणि वाढू तर अजिबात द्यायचे नाही. पण, त्याने गार्डनची शोभा मात्र वाढवत राहावी अशी व्यवस्था म्हणजेच सत्तेचे समीकरण असते ही संजय माणिकराव ठाकरे यांची पोस्ट निष्ठावान कार्यकर्त्यांना चांगलीच भावत आहे.

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017