सहाय्यक उपनिरीक्षकास ठाणेदारासह अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

तळेगाव श्‍यामजीपंत (जि. वर्धा) - बांधकाम कंत्राटदाराकडून ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तळेगावचे ठाणेदार दीपक सुखदेव साखरे (वय ५०) व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (चालक) अनिल रामाजी मसराम यांना शुक्रवारी (ता. १३) नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

तळेगाव श्‍यामजीपंत (जि. वर्धा) - बांधकाम कंत्राटदाराकडून ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तळेगावचे ठाणेदार दीपक सुखदेव साखरे (वय ५०) व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (चालक) अनिल रामाजी मसराम यांना शुक्रवारी (ता. १३) नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

बेलोरा (खुर्द) येथील चंचल इंगळे यांचा वाहनाद्वारे बांधकाम साहित्य पोहोचविण्याचा व्यवसाय आहे. इंगळे हा तळेगाव येथून ट्रॅक्‍टरमध्ये वाळू भरून नेत असताना ठाणेदार दीपक साखरे व सहाय्यक उपनिरीक्षक अनिल मसराम यांनी त्यांना अडविले. यापुढे दरमहा आठ हजार रुपये द्यावे लागतील, असे फर्मान त्यांनी सोडले. ही रक्कम अनिल मसराम याच्याकडे द्यावी, असेही सांगण्यात आले. त्यानुसार मसराम याने इंगळे यांना ठाणेदारासमोर हजर केले. श्री. इंगळे यांनी आपण सुशिक्षित बेरोजगार असून, आपला उदरनिर्वाह एका ट्रॅक्‍टरवरच असल्याचे सांगितले.  मात्र, पैसे दिले नाही, तर तुमची गाडी जप्त करून गुन्हा दाखल करू, अशी धमकी त्यांना देण्यात आली. 

इंगळे यांच्या तक्रारीवरून विभागाचे कर्मचारी हे मसराम याला घेऊन ठाणेदाराच्या घरी गेले. मात्र, अनिल मसराम तेथून पळून गेला. दरम्यान, साखरे याला ताब्यात घेण्यात आले. या वेळी घराची झाडाझडतीही घेण्यात आली. दरम्यान, पळून गेलेल्या मसरामला त्याच्या राहत्या घरून अटक करण्यात आली. 

विदर्भ

अकोला : गतवर्षी सामाजिक वनिकरण विभाग अकोल्याला विदर्भातील ‘पहिली’ ‘प्लांट टिशू कल्चर लॅब’ मंजूर झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात...

10.12 AM

नागपूर - शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असून, यासाठी ऑनलाइन अर्जाची अट घातली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया...

09.09 AM

नागपूर - शिक्षण आणि नोकरीत तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र द्यावे लागते. मात्र, आता शेती लाभाच्या योजनेसाठीही...

09.09 AM