ऑटोचालक व त्याच्या मित्राकडूनही अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नागपूर - सदरमधील शासकीय महिला वसतिगृहातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणाला नवे मिळाले असून, पीडितेवर सामूहिक अत्याचार होण्यापूर्वीच ऑटोचालक आणि त्याच्या मित्राने ऑटोतच तिचे शोषण केले होते. त्यानंतर तिला व्हेरायटी चौकातील चप्पल दुकानदार फिरोज अहमदच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ऑटोचालक कृष्णा डोंगरे आणि जितू मंगलानी यांना ताब्यात घेतले. आरोपींची संख्या आता 9 वर पोहोचली. 

19 एप्रिलला तीन मुली सदरमधील शासकीय वसतीगृहातून पळून गेल्या. त्यापैकी एक मुलीला ऑटोचालक कृष्णा डोंगरेने गाठले. तिला व्हेरायटी चौकातून कपडे आणि जेवण देण्याच्या बहाण्याने ऑटोत बसवून जंगलसदृश भागात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने मित्र जितू मंगलानी याला बोलावले. दोघांनी अत्यावर केल्यानंतर तिला फिरोज अहमद याच्या ताब्यात दिले. फिरोजने पाच साथीदारांना बोलावून सुगतनगरातील निर्माणाधीन इमारतीत गॅंगरेप केला. पहाटे पाच वाजता तिला व्हेरायटी चौकात सोडले. 

Web Title: Atrocities by autorickshaw and his friend