शिवाजी महाराजांच्या स्मारकावर भाजपचे भातखळकर म्हणाले, भलतासलता मुद्दा

bhatkhalkar
bhatkhalkar

नागपूर : शिवाजी महाराजांविषयी अनुचित उद्गार काढल्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

भातखळकर यांचे निलंबन केले जात नाही तोपर्यंत कामकाज सुरू होऊ देणार नाही, असले मनुवादी विचारांचे लोक असे काहीही बोलून अपमान करतात, असे अजित पवार यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी केली हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अतुल भातखळकर यांनी असले भलतेसलते मुद्दे काढू नका, असे म्हटल्यावर विधानसभेत गदारोळ सुरू झाला. या गदारोळात 10 मिनिटे कामकाज तहकूब करण्यात आले.

त्यानंतर शिवसेनेचे सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे की, अतुल भातखळकर यांनी भूमिका जाहीर करावी. यानंतर भातखळकर यांनी आपण माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना उद्देशून बोललो, शिवाजी महाराजांविषयी नाही. मी माझे शब्द मागे घेतो. यावर ही विरोधी पक्षाचे समाधान झाले नाही. यानंतर गोंधळ सुरू असताना पुन्हा सभागृह 15 मिनिटांसाठी बंद करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com