प्रहारचा विजय नव्‍या राजकीय पर्यायाची नांदी!

संग्रामपूर नगरपंचायतीच्‍या निकालाने जिल्‍ह्यातील प्रस्‍थापित पक्षांवर आत्‍मचिंतनाची वेळ
Bacchu Kadu Victory on Sangrampur Nagarpanchayat
Bacchu Kadu Victory on Sangrampur NagarpanchayatSakal

खामगाव : राज्‍यातील १०६ नगरपंचायतीचे निवडणूक निकाल आज (ता.१९) रोजी जाहीर झाले असून, यामध्ये बुलडाणा जिल्‍ह्यातील संग्रामपूर नगर पंचायतीच्‍या (sangrampur nagarpanchayat election)निकालाने सर्वांना आश्चर्य चकीत करुन सोडले असून, आपल्‍या बेधक स्‍वभावासाठी ओळखल्‍या जाणारे मंत्री बच्चूू कडू(minister bachhu kadu) यांनी बुलडाणा जिल्‍हावासियांना प्रहार पक्ष(prahar party) हा एक सक्षम पर्याय असल्‍याचे दाखवून देत, प्रहारचा हा विजय येत्‍या काळात नव्‍या समीकरणांची नांदी ठरू शकतो.

Bacchu Kadu Victory on Sangrampur Nagarpanchayat
जिल्हाधिकाऱ्यांची सीपीआर ला अचानक भेट; अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

ओबीसी आरक्षणाशिवाय (obc arakshan)गत महिन्‍यात पार पडलेल्‍या १०६ नगर पंचायतीचे निकाल आज (ता.१९) रोजी जाहीर झाले असून, यामध्ये जिल्‍ह्यातील मोताळा व संग्रामपूर नगरपंचायतींचा समावेश होता. तर आज जाहीर झालेल्‍या निकालांमध्ये संग्रामपूर नगर पंचायतीच्‍या निकालांनी सर्व राजकीय जानकारांचे अंदाज फेल ठरवले असून, मंत्री बच्चू कडू यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाने १७ पैकी तब्‍बल १२ जागांवर विजय मिळवित एकहाती सत्‍ता स्‍थापन केली. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाआघाडीला ५ जागा मिळाल्‍या असून,राष्ट्रवादी,भाजप आणि वंचितला खातेही उघडता आले नाही.

Bacchu Kadu Victory on Sangrampur Nagarpanchayat
शेवटचं मंगलाष्टक सुरु असताना अचानक झाली 'त्यांची' एंट्री; लग्नमंडपात उडाली तारांबळ; अखेर...

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ. संजय कुटे(ex minister sanjay kute) यांचे प्रस्‍थ असलेल्‍या जळगाव जामोद या मतदार संघातील ही नगर पंचायत असल्‍या कारणाने येथे भाजपाचेच(bjp) वर्चस्‍व राहणार असल्‍याची चर्चा सर्वत्र होत असतांना आज जाहीर झालेल्‍या निकालांमध्ये मतदारांनी प्रस्‍थापितांना डावलून नवख्या प्रहार जनशक्‍ती पक्षाच्‍या उमेदवारांना गाव विकासाची संधी दिली आहे. त्‍यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित या जिल्‍ह्यातील प्रस्‍थापीत पक्षांना पर्याय म्‍हणून आता प्रहार जनशक्‍ती पक्ष(prahar party) समोर येण्याचे हे संकेत असून, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला नंतर आता बुलडाणा जिल्‍ह्यातील प्रहारच्‍या या दमदार एंट्रीने प्रस्‍थापित पक्षांना आत्‍मचिंतन करण्यास भाग पाडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com