नारी शक्तीचा अनोखा प्रवास

मोपेड मोटारसायकलने प्रवास करताना बीएजी ग्रुपच्या सदस्य.
मोपेड मोटारसायकलने प्रवास करताना बीएजी ग्रुपच्या सदस्य.

नागपूर - महिलांनी तब्बल सातशे किलोमीटरचा प्रवास करायचा, तोही चक्क मोपेडने. असे अनोखे वेड घेऊन निघालेल्या भटकंती आत्मा ग्रुपच्या (बीएजी) पाच ध्येयवेड्या महिलांनी अनोखा प्रवास केला. तीन दिवसांच्या मोपेड मोटारसायकल प्रवासानंतर नागपुरात पोहोचल्या आणि आपल्या थरारक अनुभवांचे कथन केले. त्यांचा प्रवास आजच्या युवा नारीशक्तीला सुरक्षित मोटारसायकल चालविण्याचे धडे देणारा आहे. कल्पना चिंचखेडे, वर्षा खारमटे, श्‍वेता मेश्राम,  प्रा. प्रज्ञा पांडे, चित्कला कुलकर्णी अशी या पाच ध्येयवेड्या महिलांची नावे आहेत.

नागपूर-जबलपूर-नागपूर असा तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी मोपेडवरून केला. मार्गात त्यांना अडथळे आले. त्या पडल्याही, पण पुन्हा धैर्य एकवटून त्यांनी प्रवास पूर्ण केला.  वनविकास महामंडळात वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या कल्पना चिंचखेडे यांची दुचाकी नादुरुस्त झाली. ती दुरुस्ती करतानाच मोपेडवरून भटकंतीचा विचार आला. मैत्रिणींकडे त्यांनी तो विचार बोलून दाखवला. त्यांनी त्याला होकार दिला. भटकंती आत्मा ग्रुप (बीएजी) या गटाची स्थापना झाली. सहा सप्टेंबरला सकाळी या पाचही जणींचा ताफा जबलपूरकडे निघाला. सायंकाळी ७०० किलोमीटरचे अंतर पार करत त्या जबलपूरला पोहोचल्या. अंधार आणि पाऊस रस्ता खराब असताना एका मोपेडवरील पन्नाशी ओलांडलेल्या दोघीजणी खाली पडल्या. मात्र, सुदैवाने दुखापत झाली नाही. एक दिवस मुक्काम करीत जबलपूरच्या आसपासचा परिसरही त्यांनी दुचाकीने पालथा घातला.  रस्ता माहिती नाही, ‘जीपीएस’ काम करत नाही, अशाही परिस्थितीत त्यांनी वाटेत दिसणाऱ्या माणसांना विचारत, रस्त्यावरचे फलक वाचत ही भ्रमंती केली. नऊ सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या वेळी त्यांनी वेगळ्या मार्गाने नागपूर गाठले.

वन्यजीव, वन संवर्धनासह पक्षी निरीक्षणाचा संदेश देण्यासाठी जंगलांमध्ये मोपेडने भटकंती करण्याचा संकल्प आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील जंगलांची भ्रमंती करणार आहेत. बीएजी या नावाने व्हॉट्‌सॲप ग्रुपही तयार केला आहे. त्या माध्यमातून साहसी व स्वच्छंदपणे मोपेडवरून फिरण्यास इच्छुक महिलांना जोडण्यात येणार आहे. 
- कल्पना चिंचखेडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, गोरेवाडा प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com