काकाच्या मदतीने आतेभावाची हत्या

काकाच्या मदतीने आतेभावाची हत्या

बाजारगाव - लग्नासाठी दाखविलेली मुलगी पसंत न केल्याने रागावलेल्या मामेभावाने आतेभावास मारहाण करून ठार केले. मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरून ठेवण्यात आला होता. सहा दिवसांनी ही घटना उघड झाली. आरोपी विजय जगदीश धोंडे (वय २२) व गोवर्धन मोतीराम धोंडे (वय ४५) यांना अटक करण्यात आली.

विजय हा त्याचा मेहुणा पंकज मेटांगे (वय २६) याच्याकडे पंचशीलनगर कुंभार मोहल्ला भोपाळ येथे गेला. त्याला लग्नासाठी मुलगी दाखवायचे असल्याचे सांगून गुरुवारी कळमेश्वर तालुक्‍यातील गोंडखैरी येथे आणले. पंकजला मुलगी पसंत नसल्यामुळे त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी मंगेश पोहनकर यांच्या शेतात कामाला असलेले मामा गोवर्धनच्या मदतीने पंकजला दारू पाजली. लग्नाची मुलगी पसंत न आल्यामुळे पंकजला मारहाण करण्यात आली. या मारहणीत पंकजचा मृत्यू झाला. धुऱ्यावर खड्डा खोदून मृतदेह दफन करण्यात आला. त्यावर कचरा, गवत टाकून झाकण्यात आले. दोन दिवस होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी विजयला फोन केला, तेव्हा तो गावाला निघून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र तो अद्याप घरी आला नसून, त्याचे मोठे बाबा गणेश मेटांगे यांनी  विचारणा केली, तेव्हा लग्नाच्या नकारावरून वाद झाल्याचे दिसून आले. नातलगांनी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना विचारणा केली, तेव्हा ते घाबरले. बुधवारी अकराच्या सुमारास चौकशी करण्यात आली. त्यात दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी तपास केला. पोलिसांनी मंगेश पोहनकर यांच्या शेतात जाऊन चौकशी केली. पुरलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेहावर येथे रात्री साडेआठच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com