बारा ग्राहकांद्वारे बॅंकेची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नागपूर - बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल १२ ग्राहकांनी अडीच कोटींहून अधिकचे गृहकर्ज घेऊन इंडियन ओव्हरसिस बॅंकेची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

नागपूर - बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल १२ ग्राहकांनी अडीच कोटींहून अधिकचे गृहकर्ज घेऊन इंडियन ओव्हरसिस बॅंकेची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

शबीना अर्शद खान, अर्शद हसन खान, दोन्ही रा. पंचशीलनगर, शाहिद अहमद जीमल अहमद खान, वसीम अहमद जीमल अहमद खान, दोन्ही रा. एकता कॉलनी, यादवनगर, संगीता संजय इटनकर, जयंत धर्मराज इटनकर, दोन्ही रा. पार्वतीनगर, योगेश राऊत, रा. नंदनवन, शेख गुफान अली, अफसर अजाम अली, दोन्ही रा. सिंदीबन कॉलनी, मोठा ताजबाग समोर, रेहाणा इस्माईल शेख, रा. अजनी रेल्वे क्वॉर्टर, वकील जीमल अहमद खान, राणी वसीम अहमद खान, दोन्ही रा. एकता कॉलनी, यादवनगर अशी आरोपींची नावे सांगण्यात येतात. 

इंडियन ओव्हरसिस बॅंकेने शुभगृह हाउसिंग लोन योजना सुरू केली होती. आरोपींनी बैद्यनाथ चौकात असलेल्या बॅंकेच्या हनुमाननगर शाखेत कर्जासाठी अर्ज केले. खोटी कागदपत्रे आणि बनावट आयकर रिटर्नचे अर्ज दाखल 

करीत जुलै २०१५ ते एप्रिल २०१६ या काळात सुमारे २ कोटी ६३ लाख ७८ हजारांचे कर्ज घेतले. हा प्रकार उघडकीस येताच बॅंकेचे अधिकारी देवराव मौंदेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

ऑनलाइन गंडा
एसबीआयचा व्यवस्थापक बोलत असल्याची थाप मारून आरोपीने मोबाईलवरूनच क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती आणि ओटीपी क्रमांक मिळविला. त्याआधारे आपल्य खात्यात ५७ हजार ८०० रुपये ऑनलाइन वळते केले. कोराडी हद्दीत हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. शंभुनगरातील रहिवासी संदीप डोंगरी (५०) यांच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड आहे. त्यांना ११ जुलै २०१७ रोजी दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन आले. पलीकडून बोलणाऱ्याने बॅंकेचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून संदीप यांनी क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती दिली होती. आरोपीने ५७ हजार ८०० रुपये आपल्या खात्यात वळते केले. हा प्रकार उघडकीस येताच संदीप यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Bank fraud by twelve clients