राष्ट्रसुरक्षेसाठी कटिबद्ध राहा - ए. एस. देव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नागपूर - विद्यार्थ्यांनी केवळ स्वत:पुरता संकुचित विचार न ठेवता आपण समाजासाठी, राष्ट्रासाठी काय करू शकतो याचा विचार करायला हवा, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मेजर जनरल  ए. एस. देव यांनी केले. 

नागपूर - विद्यार्थ्यांनी केवळ स्वत:पुरता संकुचित विचार न ठेवता आपण समाजासाठी, राष्ट्रासाठी काय करू शकतो याचा विचार करायला हवा, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मेजर जनरल  ए. एस. देव यांनी केले. 

सी. पी. ॲण्ड बेरार शैक्षणिक संस्थेच्या प्रहार मिलिटरी स्कूलतर्फे आयोजित युद्ध देखाव्याचा बक्षीस वितरण सोहळा बुधवारी (ता. ४) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ए. एस. देव बोलत होते. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ १२ लाख सैनिकांवर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सैनिकांचा आकडा अत्यंत तोकडा असून यामध्ये वाढ व्हायला हवी. भावी पिढीने करिअरपुरते मर्यादित न राहता सैन्यामध्ये आपला सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रहारच्या उपक्रमाचे कौतुक करताना यामुळे विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता, कल्पनाशक्ती वृद्धिंगत होत असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकपूर्वीच्या एका गोपनीय कारवाईबाबत माहिती दिली. त्या कारवाईमुळे आज आपले काही सैनिक पाकिस्तानमध्येच असून तेथील अंतर्गत माहिती जाणून घेत असल्याचे देव यांनी सांगितले. 
स्पर्धेमध्ये एकूण १० शाळांनी सहभाग नोंदविला. विपिन वैद्य आणि सेवानिवृत्त फ्लाईंग ऑफिसर शिवाली देशपांडे यांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली. पुरस्कार सोहळ्यांतर्गत मॉडर्न स्कूल आणि भारतीय कृष्ण विद्या विहार यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. तर, प्रहार मिलिटरी स्कूल (प्रथम), बीआरए मुंडले स्कूल (द्वितीय), एस. एस. इंटरनॅशनल स्कूल (तृतीय) पुरस्कार मिळाला. आभार मुख्याध्यापिका मोहगावकर यांनी मानले. कार्यक्रमाला सेवानिवृत्त कर्नल सुनील देशपांडे, संस्थेचे सचिव अनिल महाजन उपस्थित होते.

विदर्भ

‘ऑनलाइन प्रिपरेशन पोर्टल’ सुरू होणार - जेईई, नीटचे मार्गदर्शन  नागपूर - देशासह राज्यभरात क्‍लासेसचे पीक आले आहे....

08.39 AM

रस्त्यांवर थुंकणे पडणार महाग - मनपाचे उपद्रव शोधपथक  नागपूर - रस्त्यांवर थुंकणे, कचरा टाकणे, अवैध होर्डिंग लावणे...

08.39 AM

नागपूर - पेंच जलाशयाची निर्मिती शेतीला पाणी देण्यासाठी झाली आहे. मात्र, शेतीऐवजी नागपूर शहराच्याच पाणीपुरवठ्यासाठीच त्याचा जास्त...

08.30 AM