समृद्धी रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा रक्‍ताभिषेक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

बेलगाव/बुलडाणा - प्रस्तावित मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकऱ्यांच्या हितासाठी 2013 च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी यासह अन्य विविध मागण्यांसाठी समृद्धीबाधित दहा जिल्ह्यांतील 33 तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी स्थानिक कार्यालयावर मोर्चादेखील काढला; परंतु प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला गुरुवारी बेलगाव येथे रक्‍ताभिषेक करीत रक्‍तकुंडाचे आयोजन केले होते. समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात समृद्धी महामार्ग रद्द करा, अशी मागणी रेटून धरण्यात आली. या आंदोलनात महिलांही मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या.