मधुमेहींसाठी बॅरिएट्रिक सर्जरी वरदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

नागपूर - मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे टाइप वन प्रकारचा मधुमेह आढळतो. परंतु वयाच्या पन्नाशीनंतर आढळणारा "टाइप टू‘ मधुमेह किशोरवयीन मुलांमध्ये आढळून येत आहे. ही बाब चिंताजनक असतानाच मधुमेहग्रस्त असलेल्या लठ्ठ व्यक्तींसाठी बॅरिएट्रिक सर्जरी वरदान ठरत आहे. अनेक संशोधनांनंतर आणि अभ्यासातून इलील ट्रान्सपोझिशन सर्जरी ही शस्त्रक्रिया विकसित करण्यात आली. यामुळे मधुमेहावर नियंत्रणच नाही तर 70 टक्के बराही होऊ शकतो असे "डायबिटीज केअर ऍण्ड रीसर्च सेंटर‘चे संचालक डॉ. सुनील गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

"डायबिटीज केअर ऍण्ड रीसर्च सेंटर‘तर्फे लहान मुलांच्या गोड आजाराची रजिस्ट्री तयार करण्यात आली. मुलांमध्ये "टाइप-1‘ डायबिटीज आढळतो. परंतु अलीकडे पन्नाशीत आढळून येणारा मधुमेह पंधरा ते वीस वर्षांच्या मुलांमध्ये आढळून येत आहे. इन्सुलीन तयार करणाऱ्या "बिटा‘नामक कोशिका (सेल्स) नामशेष होतात. संसर्ग आणि प्रतिरोधक शक्तीमुळे स्वतःच त्या कोशिका उद्‌ध्वस्त केल्या जातात. परंतु, बदलत्या जीवनशैलीमुळे किशोरवयीन मुलांमध्ये ज्युवेनाइल डायबिटीज आढळतो. बॅरिएट्रिक सर्जरीमुळे थेट शरीरातील मधुमेहाचे प्रमाण कमी होते, ही बाब सर्वमान्य झाली आहे. बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत शस्त्रक्रिया झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित होते, असे डॉ. गुप्ता म्हणाले. पत्रकार परिषदेला आयएमएच्या माजी सचिव डॉ. सरिता उगेमुगे, डॉ. अजय अंबाडे, डॉ. मोहित झामड, आहारतज्ज्ञ कविता गुप्ता उपस्थित होते.

रविवारी "हॅलो डायबिटीज‘
मधुमेहग्रस्तांना सामान्य जीवन जगता यावे, यासाठी रविवार, 21 ऑगस्ट रोजी "हॅलो डायबिटीज‘अंतर्गत सकाळी 9 वाजता लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात मधुमेह शिक्षणसत्र होणार आहे. साडेदहा वाजता मेयोच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी वहाणे यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. डॉ. सुनील गुप्ता, डॉ. विवेक गुप्ता, डॉ. सरिता उगेमुगे, डॉ. प्रकाश खेतान, डॉ. तरुण मिश्रा, डॉ. प्रिया कोठियान मधुमेहावरील नियंत्रणावर माहिती देतील.

Web Title: Berietrika boon for diabetes surgery