भंडारा जिल्ह्यात नदीकाठच्या जोरदार पाऊस; गावांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

भंडारदरा व मुळा आढळा पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून मुळा नदीतून 18204 क्‍युसेक्‍सने पाणी वाहत होते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

भंडारा - भंडारदरा व मुळा आढळा पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून मुळा नदीतून 18204 क्‍युसेक्‍सने पाणी वाहत होते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

रतनवाडी व पांजरे येथे 4 इंच पाऊस पडला असून आढळा पट्ट्यातही पाऊस असल्याने शुक्रवारी दुपारी बारा वाजता पाडोशी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओहरफ्लो झाले आहे. त्यामुळे आदिवासी भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. भात पेरण्या झाल्याने शेतकरी खूष आहेत मात्र मोठ्या प्रमाणात गारवा वाढल्याने जनावरे थंडीने गारठले असून त्यांची काळजी घेण्यात शेतकरी गुंतले आहेत.

अकोले तालुक्‍यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्याकाळात शेतकऱ्यांनी आपली भात पेरणी उरकून घेतली. तर गुरुवारी पावसाने रात्रभर वर्षाव करीत सर्व परिसर जलमय करून सोडला. तर कुमशेत, पाचनई, लव्हाळी या भागात अतिवृष्टी झाली असून त्यामुळे मुळा नदी भरून वाहत आहे. सतत 36 तास न थांबता पाऊस सुरु असल्याने शेतीची कामे थांबली आहेत.

फोटो गॅलरी