अपघातात सात भाविक ठार, एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

यवतमाळ - नागपूर येथून माहूर (जि. नांदेड) येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन त्यात सात भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २३) दुपारी दोनच्या सुमारास नागपूर-तुळजापूर महामार्गावरील हिवरीलगतच्या वळणावर घडली. या अपघातात एक गंभीर जखमी असून, त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

शांताराम नवले (५०), लता शांताराम नवले (४२), सरस्वती सूर्यभान नवले(६०, तिघेही रा. रनाळा, कामठी), वत्सला मस्के, नंदा फुलकर, 
भाविकांच्या वाहनाला अपघात; सात ठार, एक गंभीर गीता गिरनार व अमित शेषराव वंजारी (सर्व रा. नागपूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर चालक देवीदास फुलकर (४६, रा. नागपूर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. यातील नवले कुटुंबीय व त्यांचे साथीदार स्कार्पिओ वाहनाने उमरखेड येथे नातेवाइकांकडे जाणार होते व तेथून माहूर येथे जाऊन दर्शन घेण्याचे  त्यांचे नियोजन होते. दरम्यान, येथून दहा किलोमीटर अंतरावरील हिवरीगावालगत ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात वाहन रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन वाहनाचा चुराडा झाला. त्यात सहा जण जागीच ठार झालेत. तर अमित वंजारी याला गंभीर जखमी अवस्थेत नागपूर येथे उपचारार्थ हलवीत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच हिवरी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत पोहोचविली व ग्रामीण पोलिसांना पाचारण केले. जखमींना तातडीने यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Web Title: bhavik death in accident