मंत्र्यांनी २८ दिवसआधीच वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

श्रीधर ढगे
रविवार, 13 ऑगस्ट 2017

बुलडाणा येथील काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा ३१ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या २८ दिवस आधी आज जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे शुभेच्छा पत्र आमदार सपकाळ मिळाले. त्यांनी प्रा. राम शिंदे यांचे अग्रीम आभार मानले मात्र आपण विरोधी पक्षात आहोत हे दाखवून देण्यासही ते विसरले नाहीत.

बुलडाणा : बुलडाणा मतदार संघाचे काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्र पाठवून २८ दिवस आधीच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर हा महाराष्ट्र शासनाच्या गतिमानतेचा सुखद धक्का असल्याचे सांगत आमदार सपकाळ यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले.

बुलडाणा येथील काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा ३१ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या २८ दिवस आधी आज जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे शुभेच्छा पत्र आमदार सपकाळ मिळाले. त्यांनी प्रा. राम शिंदे यांचे अग्रीम आभार मानले मात्र आपण विरोधी पक्षात आहोत हे दाखवून देण्यासही ते विसरले नाहीत.

महाराष्ट्र शासनाच्या गतिमानतेचा सुखद धक्का मिळाला असल्याचे आमदार सपकाळ यांनी ट्विट केले व फेसबुकवर प्रा. राम शिंदे यांचे पात्र टाकले. हा विषय तसा लहान असला तर सरकारच्या दफ्तर दिरंगाईवर आमदार सपकाळ यांनी या निमित्ताने बोट ठेवले आहे. सभागृहात अभ्यासू आमदार म्हणू परिचित असेलेले सपकाळ हे सोशल मीडियात सुद्दा चर्चेत असतात हे पुन्हा दिसून आले.