"भूमकाल'च्या पूल बांधकामाला नागरिकांची "ना'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

गडचिरोली - भामरागड तालुक्‍यातील नदी, नाल्यांवर श्रमदानातून पूल बांधकामाचा एल्गार केलेल्या भूमकाल संघटनेला नेलगुंडा परिसरातील गावकऱ्यांनी जबर धक्का दिला आहे. शनिवारी (ता. 17) घेतलेल्या जनसभेत "भूमकाल‘वर दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत मदत न करण्याचा ठराव घेण्यात आला. 

गडचिरोली - भामरागड तालुक्‍यातील नदी, नाल्यांवर श्रमदानातून पूल बांधकामाचा एल्गार केलेल्या भूमकाल संघटनेला नेलगुंडा परिसरातील गावकऱ्यांनी जबर धक्का दिला आहे. शनिवारी (ता. 17) घेतलेल्या जनसभेत "भूमकाल‘वर दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत मदत न करण्याचा ठराव घेण्यात आला. 

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून आदिवासींच्या समस्या तसेच नक्षलविरोधी जनजागृतीचे काम करीत असलेल्या भूमकाल संघटनेने भामरागड तालुक्‍यातील नदी, नाल्यांमुळे होणारी अडचण लक्षात घेऊन श्रमदानातून पुलांचे बांधकाम सुरू केले. यासंदर्भात गेल्या आठवड्यात जुवी नाल्यालगत गावकऱ्यांसोबत बैठक घेऊन याच नाल्यावर पुलबांधकामाची सुरुवात करू, असे सांगितले होते. मात्र, शनिवारी नेलगुंडा परिसरात झालेल्या जनसभेत भूमकाल‘ला नागरिकांनी विरोध दर्शविला. "भूमकाल‘चे कार्यकर्ते नागपुरातील रहिवासी असून गेल्या चार-पाच महिन्यांपासून ते भामरागड परिसरात लोकांच्या संपर्कात आहेत. नदी, नाल्यांवर पूल बांधून देतो म्हणत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे खोटे आश्‍वासन देत आहेत. ही संघटना गोरगरीब जनतेच्या विरोधात काम करीत असल्याचे दिसून येते. भूमकालचा एकही कार्यकर्ता या परिसरातला नाही. त्यामुळे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आदिवासींच्या मूलभूत समस्यांशी काही देणे-घेणे नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांचे समाजकार्याचे ढोंग सुरू असल्याने यापुढे "भूमकाल‘ला या भागातील जनता कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही. तसेच आमच्या भागात येण्यास त्यांना बंदी घालू, असेही पत्रकात म्हटले आहे.

सरकार हायवे व मेनरोड तयार करण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देते. मात्र, अतिदुर्गम भागात रस्ते, पूल बांधकामासाठी पुढाकार घेतला नाही. सरकारचे नक्षलग्रस्त भागातील विकासाकडे लक्ष जावे, यासाठी रस्ते, पूल बांधकामाबाबत "भूमकाल‘ने जनजागृती केली. श्रमदानातून जुवी नाल्याच्या पुलाचे काम हाती घेतले. दुर्गम भागातील नागरिकांच्या हितासाठी संघटना काम करत राहणार.
- प्रा. अरविंद सोवनी भूमकाल संघटना. 

Web Title: "Bhumakala pool of people to work on the" no "