जन्म, लग्न, मृत्यू एकाच दिवशी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

अमरावती : एखाद्याचा जन्मदिवस व लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी येणे हा सुखद योगायोग असतो. पण, तोच त्याचा मृत्युदिनही ठरला तर..! असा मनाला चटका लावणारा योग आला उत्तराखंड राज्यात शनिवारी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मीना मुरादे यांच्या नशिबात.

सहा मे हा मीना मुरादे यांचा वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाचाही वाढदिवस. पण याच दिवशी त्यांच्यावर काळाने झडप घातली. कालच्या अपघातात त्यांच्यासोबत अमरावतीच्या आणखी तिघांचा मृत्यू झाला. मीना मुरादे यांचे पती सुधाकर मुरादेही या अपघातात गंभीर जखमी झाले आहे.

महाराष्ट्रदिनी अमरावती जिल्ह्यातील जवळपास 32 जण उत्तराखंडातील केदारनाथ यात्रेकरिता रवाना झाले. गंगोत्री- केदारनाथ मार्गावरील एका दरीत त्यांची टेम्पोट्रॅक्‍स कोसळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला.