ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राजकारण : रुचित वांढरे

BJP's politics on the issue of OBC reservation: Ruchit Wandhare
BJP's politics on the issue of OBC reservation: Ruchit Wandhare

कोरची : जिल्ह्यात भाजप सत्तेत येण्यापूर्वी जिल्ह्यातील ओबीसींचे 19 टकके आरक्षण चा मुद्दा घेऊन सत्तेत आली, सत्तेत येऊन आज 4 वर्ष 5 महिने होऊनही जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे तसेच गैरआदिवासी समाजाचे प्रश्नाचे निवारण न करता या उलट दिशाभूल करण्यात आलेली आहे , पेसा कायद्यानुसार जिल्ह्यात नोकरभरती राबविली जात आहे. याविरोधात ओबीसींमध्ये तसेच गैरआदिवासी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आणि 9 जून 2014 च्या अधिसूचनेनुसार नोकरभरतीत अन्याय होत असल्याची ओरड गैर आदिवासींकडून सुरू आहे. या अधिसूचनेनुसार, अनुसूचित क्षेत्रातील वर्ग 3 व वर्ग 4 ची पदे स्थानिक अनुसूचित जमातीमधूनच भरण्यात यावी, असा नियम होता. यानंतर झालेल्या सर्व शासकीय विभागांची भरती प्रक्रिया याच अधिसूचनेनुसार राबविण्यात आली. 4 वर्षांपासून संताप कायम असताना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 11 सप्टेंबर 2018 रोजी एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार, सरळसेवेने अनुसूचित जमातीमधून भरण्यात येणाऱ्या 12 पदांमध्ये आणखी पाच पदांची भर घातली आहे.

वन निरीक्षक(महसूल व वन विभाग), स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर व कामाठी (आदिवासी विकास विभाग) व पोलीस पाटील (गृह विभाग) ही ती पाच संवर्गातील पदे आहेत. यामुळे ओबीसी समाजबांधवांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, नोकरभरतीसंदर्भात राज्य शासनाने मागील चार वर्षांत तब्बल ९ वेळा अधिसूचना, शासन निर्णय, शुद्धिपत्रक काढले आहेत. शासनाने 27 ऑगस्ट 2018 रोजी एक परिपत्रक काढल्या नंतर जिल्ह्यातील भाजप नेत्यानी पत्रकार परिषद घेऊन गैरआदिवासींवरील अन्याय दूर केल्याची त्या परिपत्रकानुसार गैरआदिवासी समाजाला तोंडावर पाणी पुसण्याचा काम केल्याचा आरोप रुचित वांढरे यांनी केला.

अनुसूचित क्षेत्रात बिगर आदिवासींची लोकसंख्या 51 टक्क्यापेक्षा जास्त असणाऱ्या  क्षेत्रातील रिक्त पदे बिगर आदिवासीं मधून, तर आदिवासींची लोकसंख्या 51 टक्क्याहून अधिक असणाऱ्या क्षेत्रातील पदे आदिवासींमधून भरण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. मुख्य सचिव व अन्य सचिव दर्जाचे अधिकारी या समितीत होती. आणि याच समितीच्या अहवालातून राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक नवे परिपत्रक 11 सप्टेंबर 2018 रोजी काढल्याने ओबीसी तसेच गैरआदिवासी बांधवांत तीव्र रोष पसरला आहे. येथील आरक्षण पूर्ववत करावे अन्यथा येत्या ऑक्टोबर महिन्यात उपोषणावर बसण्यात येण्याचा इशारा रुचित वांढरे यांनी दिला आहे.

मत पेटीतून ओबीसी तसेच गैरआदिवासी समाजाचे शक्तिप्रदर्शन दिसणार
जिल्ह्यात भाजप सत्तेत आल्या पासून ओबीसी व गैरआदिवासी समाजात द्वेष निर्माण करण्याचा षडयंत्र केला असून, ओबीसी समाजाच्या प्रश्नाचे मुद्दे घेऊन राजकारण करीत आहेत आणि आता अवघे 4 ते 5 महिने असताना पुन्हा एकदा ओबीसी च्या मागण्या कडे राजकारण करीत आहेत आणि याची जाण ओबीसी समाजाला झाली आहे याचं विरोधात येत्या 2019 च्या निवडणूकिमधे ओबीसी आणि गैरआदिवासी समाज योग्य विचार नक्कीच करणार 
- रुचित वांढरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com