नागपूरकरांच्या डोळ्यांपुढे अंधारी

 भोले पेट्रोल पंप चौक ः रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीमुळे दुचाकी घसरून अपघाताची टांगती तलवार असून जड वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीतून मार्ग काढताना दुचाकीधारक.
भोले पेट्रोल पंप चौक ः रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीमुळे दुचाकी घसरून अपघाताची टांगती तलवार असून जड वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीतून मार्ग काढताना दुचाकीधारक.

नागपूरकरांच्या डोळ्यांपुढे अंधारी
नागपूर : शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील गिट्टी निघाली असून नव्या सिमेंट रोडवरही पसारा पडला असल्याने धुळीकणाने नागपूरकरांच्या नाकीनऊ आणले आहे. जड वाहनाने ओव्हरटेक केल्यानंतर उडणारी धूळ थेट डोळ्यात शिरत असल्याने दुचाकीधारकांना पुढील काहीही दिसत नसल्याने अपघाताची शक्‍यता बळावली आहे. धुळीमुळे डोळ्यांसह घसा, त्वचा रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत असून चिमुकल्यांमध्ये अस्थमाही वाढत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते होत आहे. मेडिकल चौक ते क्रीडा चौक, तुकडोजी पुतळा चौक ते वंजारीनगर जलकुंभ यासह अनेक सिमेंट रस्ते प्रस्तावित आहे. सिमेंटचा रस्ता प्रस्तावित असल्याने महापालिकेने तूर्तास या चाळणी झालेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्यांची गिट्टी निघाली असून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. असाच प्रकार अमरावती मार्गावरही दिसून येत असून सार्वजनिक बांधकाम विभागही कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. विद्यापीठ ते व्हीसीए चौक, आकाशवाणी चौक ते जीपीओ चौक या रस्त्यांवरील गिट्टी निघाली मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याशिवाय काही सिमेंट रस्त्यांचे काम पूर्ण झाले. मात्र, अजूनही आयब्लॉक लावण्यासाठी आणण्यात आलेली बारीक चुरी रस्त्यांवर कायम आहे. त्यामुळे या रस्त्यांवरही वाहने चालविणेच नव्हे तर बाजूच्या फूटपाथवरून पायी चालणेही कठीण झाले आहे. साधी कारही दुचाकीधारकाच्या पुढे गेल्यानंतर सर्व धूळ दुचाकीधारक तसेच त्याच्यासोबत असलेल्या लहान मुले, महिलांच्या डोळ्यात जात आहे. फुटपाथवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही हा त्रास सोसावा लागत आहे. ही धूळ डोळ्यातच नव्हे तर नाक, तोंडातून घशात शिरत असून नागरिकांत विविध आजार कायमचे घर करीत असल्याने शहर लहानांपासून वृद्धांपर्यंत चालण्यास धोकादायक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
चिमुकल्यांत त्वचारोग
धुळीमुळे केवळ डोळेच नाही तर लहान मुलांत मोठ्या प्रमाणात खाज, त्वचेवर लाल पुरळ येण्यासारखे आजारही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. चेहऱ्यावर पांढरे चट्टे, अंगाला खाज सुटणे अशा आजाराने ग्रस्त चिमुकल्यांची पालकांसोबत त्वचारोग तज्ज्ञांकडे गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे चिमुकल्यांचे फिरणेही शहरात कठीण झाल्याचे चित्र आहे.


धुळीकणाच्या माध्यमातून डोळ्यांमध्ये बॅक्‍टेरिया, व्हायरस व फंगस जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बुबुळाचा अल्सरही कायमचे अंधत्व येऊ शकते. याशिवाय धुळीकणाची जास्त एलर्जी असेल तर डोळे शुष्क होतील. त्यामुळे डोळ्याची प्रतिकार शक्ती कमी होऊन व्यक्ती काही प्रमाणात किंवा पूर्णतः अंध होण्याची शक्‍यता आहे.
- डॉ. अशोक मदान, नेत्ररोगतज्ज्ञ.

सध्या धुळीमुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहे. धुळी एलर्जी वाढविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे छिंक येणे, डोळ्यातून पाणी येणे, त्यानंतर कोरडा खोकला सुरू होतो व त्याचे रूपांतर अस्थमासारख्या आजारात होते. नाक तसेच घशात इन्फेक्‍शन झाल्यास कानावरही त्याचा परिणाम होऊन श्रवणक्षमताही कमी होते.
- डॉ. जीवन बेदी, कान, नाक, घसातज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com