देवळीत बोगस बियाणे जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

देवळी (जि. वर्धा) - देवळी येथे एकपाळा शिवारात शंकर रामजी झिलपे (रा. एकपाळा) यांच्याकडे अनधिकृत कापसाची 36 पाकिटे जप्त करण्यात आली. बियाणे गुणनियंत्रण जिल्हा भरारी पथकाने तालुकास्तरीय पथकाच्या मदतीने बुधवारी ही कारवाई केली. सदर बियाण्यांच्या पाकिटावर कुठल्याही कंपनीचे लेबल नव्हते, त्यावर लॉट क्रमांक, वैधता, मुदत आदी बाबी समाविष्ट नव्हत्या. संबंधिताने अनधिकृत साठा करून ठेवला होता. भरारी पथकाद्वारे एकूण 36 किलो बियाणे जप्त केले.
Web Title: bogus seed seized in devali