‘ब्राउन शुगर’ तस्करास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

नागपूर - वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे बुधवारी सायंकाळी विमानतळासमोर ‘ब्राउन शुगर’चे ७७ पाकिटे जप्त करण्यात आले. यात शुभम संजय काळे  (२२, रामनगर, सिव्हिल लाइन्स, चंद्रपूर) यास अटक केली, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. 

दक्षिण वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय लांबट यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अमर गायधने, ठाकरे, 

वाघ, बालू चौहान, राजेश चौहान, पंकज बोराडे, महेश, जयेश, ज्ञानेश्वर कोठे आणि मंगेश हे पथक वर्धा रोड वरील कार्गो टर्निंग जवळ हेल्मेटसक्‍ती अभियान राबवीत होते. शुभम व साथीदार दुचाकी (क्र. एमएच ३४ एटी ४९९) वरून हॉटेल प्राइडकडून खापरीच्या दिशेने जात होते. हेल्मेट न घातल्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबविले. दोघांच्याही हालचाली संशयास्पद वाटल्या. दुचाकीला नंबरप्लेटही नव्हती. त्यामुळे पीएसआय गायधने यांनी त्या युवकांची झडती घेतली. त्यावेळी शुभमच्या साथीदाराने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. मात्र, शुभम पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी शुभमकडील पिशवीतून ब्राउन शुगरचे ७७ पॉकेट जप्त केले. यात एकूण १५० ग्राम ब्राउन शुगर असल्याची माहिती आहे. पळालेल्या आरोपीकडेही ब्राऊन शुगर असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीविरोधात सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

नागपुरात तस्करांचे जाळे
शुभमने ब्राउन शुगर नागपुरातून खरेदी केली होती. तो त्याची चंद्रपूरला डिलिव्हरी देणार होता. शुभमने कुणाकडून एवढी ब्राउन शुगर खरेदी केली, याचा शोध पोलिस घेत आहेत.