विदर्भावर प्रभुकृपा; रेल्वे प्रकल्पांसाठी भरीव निधी

Railway
Railway

नागपूर : अर्थसंकल्पात यंदा रेल्वेसाठी भरीव निधी देण्यात आला. त्यातही विदर्भावर प्रभुकृपा असल्याचे दिसून येते. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील1489 कोटींच्या रेल्वेप्रकल्पांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यात 461.15 कोटींच्या नव्या कामांचा समावेश आहे. 

वर्धा-यवतमाळ-नांदेड या 270 किमीच्या रेल्वेमार्गासाठी 738 कोटी, नागपूर-वर्धा या 76.3 किमीच्या थर्ड लाइनसाठी 55 कोटी, चौथ्या लाइनसाठी 21 कोटींची तरतूद करण्यात आली असून 21 कोटी प्रशासनाला जुळवायचे आहे, तिगाव- चिचोंडा या 16.53 किमीच्या तिसऱ्या घाट लाइनसाठी 12 कोटी, 132 किमीच्या वर्धा-बल्लारशहा थर्ड लाइनसाठी 65 कोटी, इटारसी -नागपूर थर्ड लाइनसाठी 60 कोटी, वणी-पिंपळखुटी विद्युतीकरणासाठी 77.8 कोटी, आयआरआयटीटी 14 लाख असे एकूण 1028.22 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

त्याशिवाय डायमंड क्रॉसिंगवर गाड्यांची गती वाढविण्यासाठी 5.77 कोटी, गोधनी-नागपूर-खापरी ऑटोमॉटीक ब्लॉक सिग्नलिंगसाठी 34.26 कोटी, पंधरा रेल्वे कॉसिंगचे इंटरलॉकिंग 12.71 कोटी, एलईडी एक्वीपमेंट व अन्य कामांसाठी 6.72 लाख, अमरावती -नरखेड आणि नागपूर - बडनेरा मार्गावर रेल्वे उड्डाणपूल आदी कामांसाठी 461 कोटींची कामे मंजूर झाली आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत गेज परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत नागपूर-छिंदवाडा लाइनसाठी 181 कोटी, छिंदवाडा-मंडलाफोर्ट प्रकल्पासाठी 181 कोटी, जबलपूर गोंदिया बालाघाट कटंगीसाठी 1 कोटी 54 लाख, इतवारी लुप लाइनसाठी 3 कोटी 85 लाखासह विद्युतीकरण, रामटेक-पारशिवनी-खापा मार्गासाठी 9 कोटी, बिलासपूर-नागपूर चौथी लाइन 2 कोटी 6 लाख, नवीन रेल्वेमार्ग, वर्कशॉप, कारखाना साठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

रेल्वे सुरक्षेसाठी एक लाख कोटीचा विशेष निधी उभारण्यात येणार आहे. त्यातील 12 कोटी नागपूर विभागाला मिळणार आहेत. त्यात वर्धा-चितोडा 4.26 किमीची दुसरी कॉड लाइन, इटारसी-आमला-नागपूर-वर्धा- भुसावळ लुप लाइन, अजनी स्टेशन सॅटेलाइट डेव्हलपमेंट आदी कामांचा समावेश आहे. 

नागपूर स्थानकावर मेहरनजर 
नागपूर रेल्वेस्थानकावर लीप्ट आणि सरकते जिने लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन फ्लायओव्हर उभारून चार सरकते जिने लावण्यात येणार आहे. यासोबतच एफओबीवरून खाली उतरण्यासाठी लिफ्ट लावली जाणार आहे. गोधनी खापरी रेल्वेस्थानकाचाही आदर्शवत विकास करण्यात येणार असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी एकात्मिक सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार असून त्यासाठी आवश्‍यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com