आकडेवारी मागणीचा तगादा; प्रशासन हतबल

आकडेवारी मागणीचा तगादा; प्रशासन हतबल

संग्रामपूर(बुलढाणा) - तालुक्यात गारपीट होऊन 11 दिवस उलटले असून अद्याप सर्वेक्षणची आकडेवारी पोहचली नाही. या साठी जिल्हा पातळी वरून अधिकारी सातत्याने तालुका स्तरावरील अधिकारी वर्गासोबत संपर्क साधत आहेत.

तालुक्यात 11 फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस आनी गारपीट झाली होती.या मध्ये गहू हरभरा कांदा भाजीपाला डाळींब केळी संत्रा व मका आदी शेती पिकाचे नुकसान झाले . या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करावे असे आदेश असतांना 11 दिवस झाले असताना ही नुकसानीचा एकंदरीत आकडा तालुका स्तरावर तीनही विभागाकडून गोळा करण्यासाठी अधिकाऱ्याची कसरत सुरूच आहे. महसूलचे तलाठी, पंचायत समितीचे ग्रामसेवक, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक असे तीन विभागाचे कर्मचारी मिळून 95 गावाचे सर्वेक्षण करणयाची जबाबदारी होती. या पैकी काहीचेच आकडे जमा झाले आहेत.

तहसीलचे नायब तहसीलदार पवार दोन दिवसा पासून कृषी कार्यालय आणि पंचायत समिती मधे आकडे घेणे साठी चकरा मारीत असल्याचे दिसत आहेत.जिल्हा पातळीवरून नुकसानीची आकडेवारी मागणीचा तगादा सुरू असल्याने सर्वे करणारे कर्मचारी माहिती देण्यास विलंब करीत असल्याने तालुका प्रशासन हतबल दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com