संभाजी ब्रिगेडने केला खासदार संजय राऊत यांचा निषेध

श्रीधर ढगे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

खासदार संजय राऊत यांनी सामाजिक सौजण्याचा अपमान केला आहे. त्याच्या या लिखाणाचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करतो.

खामगाव : छत्रपती संभाजी राजे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांचा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

खामगाव उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. निवेदनात नमूद आहे की,खा. संजय राऊत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक लिखाण केले असल्याने समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी सामाजिक सौजण्याचा अपमान केला आहे. त्याच्या या लिखाणाचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करतो. तसेच आमच्या भावनांचा उद्रेक होणार नाही याची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव सुनील सातव ,तालुका अध्यक्ष रणजित देशमुख,उपाध्यक्ष आकाश देशमुख,गणेश विंचनकर ,अनंत मराठा, कृष्णा वडोदे, अक्षय वानखडे, राम देशमुख, नितीन देशमुख, प्रशांत देशमुख, शाम देशमुख, वैभव देशमुख, चेतन देशमुख, वेदांत देशमुख, पवन इंगळे, अरविंद देशमुख आदींची उपस्थिती होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :