बुलडाण्यातील पाणी पुरवठा योजनांत 2000 कोटींचा गैरव्यवहार

श्रीधर ढगे
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

चौकशी पथके नेमणार : मुख्य सचिव

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील 1420 गावात शासकिय पाणी पुरवठा योजेनत दोन हजार कोटिंचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार बुलडाणा जिल्हा शासकीय पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितिने पुरव्यानिशी राज्याचे मुख्य सचिव सुमित मालिक याच्याकडे बैठकीत केली. मुख्य सचिव मलिक यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याशी या बैठकीतूनच वीडिओ कॉन्फ्रेंसद्वारे चर्चा करुन चौकशी पथके नेमन्याचा सूचना केल्या असल्याची माहिती समितिने दिली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टा तसेच टंचाईग्रस्त 1420 गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी शासकीय पाणी पुरवठा योजनावर कोट्यवधी रूपयाचा निधी सरकारने खर्च केला. प्रत्यक्षात ही गावे अजूनही तहानलेली आहेत. बहुतांश योजना अपूर्ण आणि बंद आहेत. परिणामी या योजनावरील कोट्यावधी रूपये खर्च पाण्यात गेला आहे. खारपाणपट्टयातील योजना अपूर्ण असल्याने किडनी आजराने अनेक नागरिकांचे बळी  जात आहेत. मेहकर , खामगांव , चिखली, मलकापुर, बुलडाणा, सिंदखेडराजा व जळगाव जामोद मतदार संघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती यावेळी मुख्य सचिव सुमित मालिक यांना बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सुबोध सावजी, काँग्रेस नेते संजय ठाकरे पाटील यांनी दिली.

यावेळी मुख सचिव सुमित मालिक यांनी बुलडाणा जिल्ह्याधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा वीडियो कॉन्फ्रेंसिंगमधे चर्चा केली. शासकिय पाणी पुरवठा योजनात झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी पथके नेमून दोषीवर  कारवाई केल्या जाईल अशी माहिती श्री. मलिक दिली असे समितिने सांगितले. दरम्यान शासकीय पाणी पुरवठा योजनात राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून कंत्राटदार व अधिकारी यांची तालुका पातळीपासुन मंत्रालय पर्यन्त साखळी आहे, असा आरोप काँग्रेसचे खामगाव येथील नेते संजय ठाकरे पाटील यांनी केला आहे.

Web Title: buldhana marathi news water scheme scam