शेगाव: जमीयत उलमा ए हिंदच्या वतीने अभूतपूर्व अमन रॅली

संजय सोनोने
रविवार, 13 ऑगस्ट 2017

देशातील अल्पसंख्याक समाजाला विशेष लक्ष्य करुन त्यांच्यावर अन्याय अत्याचार केल्या जात आहे. हा अन्याय अत्याचार थांबविण्यात यावा. सर्वच समाज या देशात गुण्या-गोविंदाने राहावे हा संदेश देण्यासाठी रविवारी देशभरात जमीयत उलमा ए हिंदच्या वतीने अमन रॅली काढण्यात आली.

शेगाव : राज्यात व देशात सर्वत्र शांतता नांदावी व कुठल्याही अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार होवू नये, असा संदेश देत जमीयत उलमा ए हिंदच्या वतीने अमन रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आज शेगावात 5 हजार मुस्लीम बांधवासह संभाजी ब्रिगेड आणि बामसेफच्या पदाधिकार्‍यांनी अमन रॅलीत सहभाग नोंदविला. यावेळी शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देशातील अल्पसंख्याक समाजाला विशेष लक्ष्य करुन त्यांच्यावर अन्याय अत्याचार केल्या जात आहे. हा अन्याय अत्याचार थांबविण्यात यावा. सर्वच समाज या देशात गुण्या-गोविंदाने राहावे हा संदेश देण्यासाठी रविवारी देशभरात जमीयत उलमा ए हिंदच्या वतीने अमन रॅली काढण्यात आली.

शेगाव शाखेच्या वतीने शहरात सकाळी 11 वाजता स्थानिक टिपु सुलतान चौकातुन या मुक रॅलीला सुरुवात करण्यात आली. अशफाकउल्ला चौक, गांधी चौक, शिवाजी चौक, अग्रसेन चौक, बसस्थानक, आठवडी बाजार, शहीद अब्दुल चौक मार्गे ही महा अमन रॅलीचा समारोप टिपु सुलतान चौकात करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी रॅलीला संबोधित केले. जमीएत चे अध्यक्ष हाफीज मो.तसलीम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारोपीय कार्यक्रमात मौल्वी अनिस, मुफ्ती अनिस, मौलाना रहेमतुल्लाह, मौलाना आताऊल्ला खान, मौलाना अहमद, मौलाना अजहर, मौलाना हबीब, मौल्वी युनुस, मो. इरफान गु. दस्तगीर, मो. अन्सार, हाफीज आबीद, सईद जमदार, अ.रज्जाक आदींची यावेळी उपस्थिती होती.

या कार्यक्रमामध्ये संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष विठ्ठल अवताडे, बामसेफचे गोवर्धन गवई यांची उपस्थिती होती. जमीयतच्या अमन रॅलीमध्ये 5 हजाराच्या जवळपास नागरिकांची उपस्थिती होती. ठाणेदार डी. डी. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.