नांदुरा येथील पत्रकारांकडून स्वच्छता अभियान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

एकदिवसीय या मोहिमेत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात शासनाचे विविध उपक्रम राबविले जातात की नाही.त्यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येतात का,शाळा,महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना काही अडचणी आहेत का याचीही पाहणी पत्रकार मंडळी करणार आहेत.

नांदुरा(बुलडाणा) : नांदुरा येथील पत्रकार संघाच्या वतीने दि.२६ रोजी पत्रकारसंघाचे अध्यक्ष यशवंत पिंगळे यांच्या आदेशान्वये तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये यामध्ये स्वच्छता अभियान व इतर शासकीय उपक्रम योग्य रीतीने राबविल्या जातात की नाही.तसेच या कार्यालयात काही समस्या आहेत का?याची पाहणी करून त्याबाबत शासनास सूचना करावयाच्या व असे करूनही समस्या निकाली लागत नसतील तर आपल्या लेखणीतून या समस्यांना वाचा फोडायची या उदात्त हेतुतून ही संकल्पना साकारण्यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे.

एकदिवसीय या मोहिमेत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात शासनाचे विविध उपक्रम राबविले जातात की नाही.त्यासाठी त्यांना कोणत्या अडचणी येतात का,शाळा,महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना काही अडचणी आहेत का याचीही पाहणी पत्रकार मंडळी करणार आहेत. आज दि.२६ रोजी शहरातील पत्रकारांनी पं. स.,तहसील कार्यालय व शाळा महाविद्यालयात तसेच इतर शासकीय कार्यालयात भेट दिली असता अनेक समस्यांना कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी वाचा फोडली.यात कर्मचाऱ्यांची प्रत्येक विभागात रिक्त पदे असल्याने अतिरिक्त ताण सहन करावा लागत असल्यामुळे शासनाच्या अनेक योजना राबविताना त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. स्वच्छता अभियानाची प्रगती तालुक्यात बऱ्यापैकी दिसून आली.

ग्रामीण भागातील शाळांत व शासकीय कार्यालयात पाहणी व चौकशी केली असता तालुक्यातील अनेक शाळा शिकस्त झाल्या आहेत.शिक्षकाची पदे रिक्त असल्याने एकाच खोलीत दोन दोन वर्ग भरावे लागत आहे .तर काही जि. प.च्या शाळांना इतर शासकीय निवाऱ्याचा आधार घ्यावा लागत आहे.या समस्येबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचा संकल्प यावेळी पत्रकारांनी केला आहे.असे हे आगळेवेगळे अभियान राबविल्याबद्दल तालुक्यातील सर्व घटकानी यावेळी पत्रकाराचे तोंडभरून कौतुक केले.या पाहणी व चौकशी अभियानात सकाळचे शहर बातमीदार प्रवीण डवणगे,वैभव काजळे,पुरुषोत्तम भातुरकर,रामा तायडे,सह पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पिंगळे, विनोद गावंडे, एकनाथ अवचार, शैलेश वाकोडे,संदीप गावंडे,गणेश आसोरे,सुहास वाघमारे, किशोर खैरे,राजू काजळे, विरेंद्रसिंग राजपूत सह सर्व पत्रकार सामील झाले होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :