बुलडाणा जिल्ह्यातील २७९ गावात थेट सरपंच निवडला जाणार

विरेंद्रसिंह राजपूत
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

या निवडणुकीत पहिल्यांदाच सरपंचाची निवड ही जनतेतून होणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह तर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांमध्ये धकधक निर्माण झाली आहे. जिल्ह्यात २७९ गावातील सरपंचाची निवड ही थेट मतदारातून होत असल्याने या गावात राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे.

नांदुरा (बुलडाणा) : नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान अर्ज दाखल केले जाणार असून २७ सप्टेंबर रोजी अर्ज मागे घेतले जातील. ७ ऑक्टोबरला मतदान तर ९ ऑक्टोबरला जिल्ह्यात मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीत पहिल्यांदाच सरपंचाची निवड ही जनतेतून होणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह तर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांमध्ये धकधक निर्माण झाली आहे. जिल्ह्यात २७९ गावातील सरपंचाची निवड ही थेट मतदारातून होत असल्याने या गावात राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे. सरपंच पदासाठी निघालेल्या रोस्टरनुसार लायक उमेदवाराची चाचपणी सर्व राजकीय पक्षाकडून सध्या केली जात आहे.

नांदुरा तालुक्यातही १३ गावात ग्रामपंचायतची निवडणूक होणार असून तालुक्यात १३ सरपंच हे त्या गावातील मतदाराकडून निवडले जाणार आहेत. त्यादृष्टीने तालुक्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. या तालुक्यात निमगाव, पातोंडा, वडगाव डीघी, तिकोडी, पिंप्री आढाव, कोकलवाडी, दहिवडी, तरवाडी, मुरंबा, माटोडा, वळती खुर्द, अवधा बु:,व भोटा या १३ ग्रामपंचायतचा समावेश आहे.एकंदरीत ही सरपंचपदाची निवड ही मतदारातून थेट असल्याने मिनी पं. स.सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांसाठी नांदी ठरणार असल्याने ही निवडणूक राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. मात्र ही निवडणूक सर्व राजकीय पक्षांना आपल्या अधिकृत चिन्हाशिवाय लढवावी लागणार आहे.

विदर्भ

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून...

03.42 PM

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर जारावंडी मुख्य रस्त्यावरून वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुलाचे नुकसान...

02.09 PM

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017