दारूबंदीच्या लढाईला यशस्वितेची किनार- अखेर दुकानाला लावले सील

आशिष ठाकरे
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी ग्रामीण भागात महिला लढा उभारत दुकान बंद करण्यासाठी आंदोलन, निवेदन देत आहेत.

बुलडाणा : जिल्ह्यात आतापर्यंत दारूबंदीसाठी अभिनव आंदोलन करत सातत्याने मागणी रेटून असलेल्या अस्तित्व महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेमलताताई सोनुने यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी मलकापूर ग्रामीण भागातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना चर्चेला बोलावून समस्येचे स्वरूप जाणल्यानंतर अखेर त्यांच्या या लढाईला आज (ता. 8) यश येऊन राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी दुकानाला सील लावले. 

मलकापूर ग्रामीण परिसरातील जनता कॉलेज ते बन्सीलाल नगर मार्गावरी चिंतामणी नगर येथील दारु दुकान बंद करण्यासाठी शेकडो महिल व पुरुषांनी अस्तित्व महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेमलता सोनुने यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यदिन आंदोलन करण्याचे शस्त्र उगारण्यात आले होते. यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 24 ऑगस्टला धडक मोर्चा नेमून परिसरातील महिला, मुलींना होणार्‍या त्रासाबाबत कल्पना देऊन त्यांच्या दालनात हरतालिका पूजा मांडत आंदोलन करण्यात आले. यावर 28 ऑगस्टला जिल्हाधिकार्‍यांनी चर्चा करण्यास बोलावून समस्या जाणून घेतल्या होत्या. यानंतरही आठवडभरात कारवाई न झाल्यामुळे बुधवारी (ता. 6) जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन आज (ता. 7) दारु दुकान बंदीविरोधात आंदोलन करण्यात येणार होणार होते. यावर प्रशासनाने तत्काळ हालचाली करत सदर दुकानाला गुरुवारी सिल लावले आहे. 

दारूबंदीच्या प्रक्रियेत प्रारंभाचा खेळ
दारुमुळे महिलांना होणारा रोजचा त्रास, युवा पिढीचे उद्वस्त होणारे आयुष्य इतर समस्या पाहता जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी ग्रामीण भागात महिला लढा उभारत दुकान बंद करण्यासाठी आंदोलन, निवेदन देत आहेत. तर, दुसरीकडे शासन महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात दारु दुकान, बार सुरू करण्याच्या प्रयत्नात असताना महिलांच्या संरक्षणाची हमी देणारे शासनच त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा सवाल निर्माण होत आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला
महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा ! 
माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे
गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी
जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
जनसागर लोटला
दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी
गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू
ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)