शिवसेनेने प्रवाशांसाठी सुरु केली मोफत बससेवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा सध्या संप सुरु आहे. ऐन दिवाळीत संप सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. मेहकर तालुका शिवसेनेच्या वतीने सेंट्रल पब्लीक स्कूलच्या आठ बसेस आजपासून जानेफळ, डोणगाव, लोणार, सोनाटी, हिवरा आश्रम मार्गावर धावणार असून ही सेवा शिवसेनेच्या वतीने मोफत व संप मिटेपर्यंत राहणार आहे.

मेहकर : एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून यावर उपाय म्हणून शिवसेना खासदार तथा संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव यांनी मेहकर तालुका शिवसेनेच्या वतीने प्रवाशांकरिता मोफत बससेवा सुरु केली असून, ही बससेवा संप मिटेपर्यंत सुरु राहणार आहे.

राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा सध्या संप सुरु आहे. ऐन दिवाळीत संप सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. मेहकर तालुका शिवसेनेच्या वतीने सेंट्रल पब्लीक स्कूलच्या आठ बसेस आजपासून जानेफळ, डोणगाव, लोणार, सोनाटी, हिवरा आश्रम मार्गावर धावणार असून ही सेवा शिवसेनेच्या वतीने मोफत व संप मिटेपर्यंत राहणार आहे. आज ११ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिकवणीनुसार व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्केच राजकारण करतो. संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहे. आपल्या हिंदु संस्कृतीत दिवाळी सण हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. वर्षभर माहेरी न आलेल्या लेकीबाळी सुद्धा दिवाळीला माहेरी येतात. त्यांना व इतर प्रवाशांच्या सोयीसाठी शिवसेनेचा हा उपक्रम आहे.

यावेळी शिवसेना आमदार संजय रायमूलकर, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, शहरप्रमुख तथा उपाध्यक्ष जयचंद बाठीया, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, तहसीलदार संतोष काकडे, पं.स. सभापती जया वैâलास खंडारे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, आरोग्य सभापती मनोज जाधव, शिक्षण सभापती रामेश्वर भिसे, अर्थ व नियोजन सभापती तौफिक कुरेशी, नगरसेवक विकास जोशी, पिंटू सुर्जन, माधव तायडे, मनोज घोडे, गणेश लष्कर, हनिफ गवळी, पी.आर. देशमुख, संजय शेवाळे, समाधान सास्ते, संतोष पवार, मोहन बोडखे, विनायक सावंत, भास्कर राऊत, आक्का गायकवाड, युवासेनेचे निरज रायमूलकर, संकेत चिंचोलकर, विजय सपकाळ, संजय ठाकूर, सरपंच अनिल सावंत, उपसभापती बबनराव तुपे, संचालक रामेश्वर बोरे सह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते. यानंतर खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, यांनी मेहकर एस.टी. आगारात जावून संपकरी कर्मचार्‍यांसोबत चर्चा केली.