कर्जमूक्तीसाठी देव सरकारला सूबूध्दी देवो... : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

शेगाव (बुलढाणा): राज्य सरकारने शेतकरी कर्जमूक्तीसाठी घोषणा केली खरी. पण ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्याची सुबूद्धी देव सरकारला देवो, असे प्रतिपादन शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरे यांनी केले. विदर्भ पंढरी शेगाव येथे शिवसेना पदाधिकारी व शेतकरी मेळाव्यात आज (गुरुवार) ते बोलत होते.

अकोला येथून शेगाव आगमन झाल्यानंतर ठाकरे यांनी श्रींच्या मंदीरात जावून समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून कृष्णा कॉटेज येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना नेहमीच शेतकरी बांधवासोबत होती आहे व पूढेही राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. समृध्दी महामार्गासाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या पाठिशी शिवसेना राहील, असेही ते म्हणाले.

सरकारवर टिका करताना शेतकर्यांना 'साले' म्हणणाऱयांना शिवसेना रडविणार असल्याचा ईशाराही ठाकरे यांनी जाता-जाता दिला. मेळाव्याला शेतकरी व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.