दहावीच्या परीक्षेत वऱ्हाडात बुलडाणा प्रथम, वाशीम दुसऱ्या क्रमांकावर

वऱ्हाडात बुलडाणा जिल्हा प्रथम, वाशीम दुसऱ्या क्रमांकावर
वऱ्हाडात बुलडाणा जिल्हा प्रथम, वाशीम दुसऱ्या क्रमांकावर

अकोला - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. अमरावती बोर्डात बुलाडाणा जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, वाशीम जिल्हा मात्र दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. अकोला जिल्हा निकालाचा टक्का वाढूनही बोर्डात चौथ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2017 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिन्ही जिल्ह्यात उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी मुलांच्या तुलनेत अधिक आहे. बोर्डात प्रथम आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील 499 शाळांमधील 40,796 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी 40,652 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 35,972 म्हणजे 88.89 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात 17,798 मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 16,225 म्हणजे 91.16 टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात. परीक्षा देणाऱ्या 22,854 मुलांपैकी 19,747 म्हणजे 86.41 टक्के मुलं उत्तीर्ण झालेत. मार्च 2016 च्या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 87.63 टक्के होता. बोर्डातून दुसरा क्रमांक असलेल्या वाशीम जिल्ह्यातील 292 शाळांमधील 20,932 विद्यार्थ्यांपैकी 20816 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 18,186 म्हणजे 87.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मार्च 2016 मध्ये वाशीमचा निकाल 87.64 टक्के होता. वाशीम जिल्ह्यात 8,943 मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 8092 म्हणजे 90.48 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यात. 11,873 मुलांपैकी 10,094 म्हणजे 85.02 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. बुलडाणा, वाशीमनंतर वऱ्हाडात अकोल्याचा तिसऱ्या क्रमांक आहे. मार्च 2016 मध्ये अकोला जिल्ह्यातील 77.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यावेळी अकोला जिल्ह्याची निकालाची टक्केवारी वाढली आहे. जिल्ह्यातील 28,413 विद्यार्थ्यांपैकी 84.02 टक्के म्हणजे 23,874 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अकोला जिल्ह्यात 13,438 मुलींपैकी 88.39 टक्के म्हणजे 11,878 मुली उत्तीर्ण झाल्यात. जिल्ह्यात 14,975 मुलांनी परीक्षा दिली होती.त्यापैकी 80.11 टक्के म्हणजे 11,996 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

वऱ्हाडातील निकाल

जिल्हा उत्तीर्ण मुलं उत्तीर्ण मुली टक्केवारी
बुलडाणा 19747 16225 88.49
वाशीम 10094 8092 87.37
अकोला 11996 11878 84.02


अकोल्यात गायत्री नंबर 1
शहरातील हिंदू ज्ञानपीठ शाळेची विद्यार्थीनी गायत्री संजय सरोदे हीला 500 पैकी 498 (99.60 टक्के) गुण मिळाले आहेत. तीने जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याचा दावा शिक्षण संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे ती महान येथील रहिवाशी असून शेतकऱ्याची मुलगी आहे. तीच्या या यशाबद्दल सर्वत्र तीच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com