बुलडाणा : तूर खरेदीसाठी काँग्रेसचे डफडे बजाओ आंदोलन

श्रीधर ढगे
गुरुवार, 22 जून 2017

माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले.

खामगाव : नाफेड केंद्रावर पडून असलेली शेकडो क्विंटल तूर खरेदी करावी या मागणीसाठी आज (गुरुवार) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने 'डफडे बजाओ' आंदोलन करण्यात आले.

माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. बुलडाणा जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकरी बांधवांची तूर खरेदीच्या प्रतीक्षेत असून, ही तूर सरकारने लवकर खरेदी करावी, नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा सानंदा यांनी यावेळी दिला.