टिप्पर-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू

उमरेड - अपघातात चेंदामेंदा झालेली कार.
उमरेड - अपघातात चेंदामेंदा झालेली कार.

चांपा - नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगावजवळ सोमवारी (ता. ११) सकाळी टिप्पर व कारमध्ये जोरदार धडक झाली. यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. सुशील जावळे (वय ३०), वडील वसंत जावळे (वय ६१) आणि आई पुष्पा जावळे (वय ६०, शक्‍तीनगर खरबी चौक रोड) ही मृतांची नावे आहेत.

सोमवारी खरबी चौक येथील शक्‍तीनगर सुशील जावळे हे आई पुष्पा व वडील वसंत जावळे यांच्यासह पवनी येथील सासरला पत्नी पद्मिनी व चार महिन्यांचा मुलगा कौस्तुभ याला आणायला गेला होते. पवनीवरून परत येत असताना सकाळी सातच्या सुमारास पाचगाव येथे नागपूरवरून भंडाऱ्याकडे जाणारे टिप्पर आणि सुशीलच्या कारची एकमेकांशी धडक झाली. कारचालक सुशीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जगदीश गायकवाड, एएसआय पांडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या सुशीलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कारमधील मागच्या सिटवर बेशुद्ध पडलेल्या जावळे दाम्पत्याला पोलिसांनी बाहेर काढून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. कुही पोलिसांनी टिप्पर चालक कन्हैयालाल पटेल (वय २८, राजनांदगाव छत्तीसगड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

दोन वर्षांपूर्वीच झाले होते सुशीलचे लग्न
दोन वर्षांपूर्वी सुशीलचा विवाह पद्मिनीसोबत झाला होता. चार महिन्यांपूर्वी त्याला मुलगा झाला. सुशील आईवडिलांसोबत सासरला पत्नी आणि मुलाला आणायला गेला. सासरे बंडू भोयर यांनी नकार दिल्यानंतर काही दिवसांसाठी पत्नी व मुलाला आणायचा विचार सुशीलने रद्द केला होता. सकाळी ते नागपूरला परत येण्यासाठी निघाले होते. घरी आल्यानंतर सुशील कंपनीत ड्यूटीवर जाणार होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com