कंत्राटदाराच्या तक्रारीवरून विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

  • आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी गृहपालाच्या दहशतीखाली
  • पालकांना पाल्यांच्या भविष्याची चिंता 

चिमूर : मुलांचे आदिवासी वसतिगृह चिमूर येथे गेल्या महिनाभरापासून सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या गृहपालाला सांगितल्या. मात्र, गृहपालाने विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करून एक राजकीय पुढारी असलेल्या कंत्राटदाराच्या तक्रार अर्जावरून विद्यार्थ्यांचा दोष नसतानाही वसतिगृहात राहणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांच्या पालकांना तुमचा मुलगा वसतिगृहात गैरवर्तन करतो म्हणून गृहपालाने विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस बजावल्या आहेत.

आदिवासी जमातीला मुख्य प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने त्यांचा सर्वांगीण विकास करण्या करीता आदिवासी मंत्रालया अंर्तगत केंद्रात आणी राज्यात अनेकविध योजना कार्यान्वीत करण्यात आल्या. शैक्षणिक विकासाकरीता महाराष्ट्र राज्य शासणाच्या आदिवासी विकास विभागा अंतर्गत एकात्मीक आदिवासी प्रकल्पा अंतर्गत आदिवासी मुलांच्या वसतिगृहाची सोय करण्यात आली. वसतिगृहात त्यांना नास्ता, भोजन व इतर सर्व सोयी सुविधा पुरविण्यात यावे असे असतानाही बोकाडलेल्या भ्रष्टाचारामुळे आणी जास्त लाभाच्या हव्यासा पोटी त्यात धरसोड करण्यात येते. याची तक्रार जर विद्यार्थ्यIनी केल्यास त्यांना वसतिगृहा बाहेर करण्याची धमकी देण्यात येते.

चिमूर येथील एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालया अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह चालु असुन नास्त्या मध्ये द्यायच्या मेनु संबधांने विद्यार्थी संवेदनशील होऊन प्रश्न करून त्रास देतात व नास्ता घेण्यास मणाई केली अशा प्रकारे राजकीय पक्षाचे नेते आणी कंत्राटदारांनी गृहपालाच्या नावाने तक्रार अर्ज केला या अर्जाप्रमाणे गृहपालाने सरळ विद्याथ्र्याच्या पालकास आपल्या पाल्याचे वर्तन बरोबर नसुन या विषयी पाल्यास समज द्यावी अन्यथा कोणतीही पुर्वसूचना न देता वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात येईल याची नोंद घेऊन पत्र मिळताच दोन दिवसाच्या आत गृहपालस भेट देण्याची धमकीवजा इशारा पत्र दिला. यामुळे विद्यार्थी गृहपालाच्या दहशतीत असुन मानसीक दडपणात वसतीगृहात वास्तव्य करीत आहेत.

शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे जो प्राशण करेल तो गुरगुरेल या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुल मंत्राप्रमाणे आपले पाल्य चांगले शिक्षण घेऊन स्वतःसोबतच कुटूंबाचे, समाजाचे, जमातीचे पर्यायाने गाव, राज्य देशाच्या विकासाच्या प्रवाहात येतिल अशा प्रकारचे स्वप्न रंगवित असलेल्या आदिवासी जमाती मधील वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या पालकांना मात्र वसतिगृहात चालू असलेल्या एकंदरीत प्रकरणामुळे पाल्याच्या भविष्याची चिंता वाटु लागली आहे. पालकांना पाठविण्यात आलेल्या पत्रात पाल्याच्या सुविधांविषयी दिलेल्या गर्भित इशाऱ्याच्या पत्राने मुलांचे शिक्षण, पालन पोषण कसे करणार मुलगा, शिक्षणापासून वंचित तर राहणार नाही. अशी भीती भेडसावीत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांमध्ये वसतिगृहातील सोयी सुविधा, प्रवेश प्रक्रीया विषयी सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी चर्चा सुरू आहे.