डोंगर्लावासीयांना शेतजमिनीचा मोबदला मिळाला 14 वर्षानंतर 

जितेंद्र सहारे
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नारायण जांभुळे यांच्या अथक प्रयत्नास यश 
 

चिमूर -  तालुक्यातील डोंगर्ला येथील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी तलाव बांधकामा करीता 2 O13 मध्ये संपादीत करण्यात आल्या होत्या. मात्र शेतजमीनीचा मोबदला काही मिळालाच नाही. याकरीता स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात गेली चवदा वर्ष निवेदने, धरणे आणी ताला ठोको आंदोलन करण्यात आलीत. अखेर चवदा वर्षानंतर डोंगर्ला वासीयांना न्याय मिळाला असुन धनादेशाचे वाटप करण्यात आले .

चिमूरपासून I 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर्ला येथे जिल्हा परीषद चंद्रपुर अंतर्गत लघु सिंचण विभागा कडून २०० 3 ला 3२ शेतकऱ्यांच्या जमीनी भुसंपादित करण्यात आल्या .२००5 मध्ये तलावाचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना मागील चवदा वर्षापासून मोबदल्या करीता संबधित कार्यालयाच्या हेलपाटया मारून खेटा झिजविल्या. नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात पत्रव्यवहार, निवेदने, धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र तरी सुद्धा प्रशासणास जाग न आल्याने लघु सिंचाई कार्यालयास ताला ठोकण्यात आले. या आंदोलनाचे फलीत म्हणुन मोबदला मिळणार या आंनदा अतिरेकाने लिलाबाई चौधरी वय 6२ हिचा मृत्यु झाला .

अखेर प्रशासणास जाग येऊन डोंगर्ला येथील बारा शेतकऱ्यांना एक करोड 5 लाख 63 हजार 616 रुपये मंजुर झाले असुन, यापैकी नत्थु कवडू चौधरी यांना 5 लाख 8I हजार, कचरू रामकृष्ण चौधरी यांना 5 लाख 60 हजार, हेमराज बाजीराव चौधरी यांना २ लाख 86 हजार आणी माणीक लक्ष्मण चौधरी यांना 17 लाख 6२ हजार रूपयाचा धनादेश मुद्रांक नोंदणी शुल्क व विक्री कार्यालया पुढे बहाल करण्यात आले. उर्वरीत शेतकऱ्यांना लवकरच दस्ताएवज प्रक्रीया पुर्ण होताच धनादेश वितरीत करण्यात येणार असल्याची माहीती नारायण जांभुळे यांनी दिली. याप्रसंगी लघु सिंचाई विभागाचे शाखा अभियंता एम .बी. दिकुंडवार, लिपीक पी .आर. कोल्हे आणि लाभार्थी शेतकरी उपस्थित होते .