स्वस्त भाज्यांमुळे सामान्यांना दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

पालांदूर - कागदोपत्री महागाई वाढत असली तरी, सध्या प्रत्येक गावातील बाजारात भाजीपाला स्वस्त मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात निराशा आली आहे. 

पालांदूर - कागदोपत्री महागाई वाढत असली तरी, सध्या प्रत्येक गावातील बाजारात भाजीपाला स्वस्त मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात निराशा आली आहे. 

दिवाळीनंतर अनुकूल वातावरणामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे पीक घेतले. पीक चांगले आल्यामुळे बाजारात अपेक्षापेक्षा अधिक प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या आहेत. उलट शेतीची मशागत, खत, कीटकनाशके व मजुरी यांच्या किमती सातत्याने वाढल्या आहेत. बाजारात भाजीपाल्याला पुरेशी किंमत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकाचा तोडा करणेसुद्धा परवडत नाही. 

नोटाबंदीनंतर बाजारात झालेली घसरण अजूनही सुरूच आहे. त्यामुळे बाजारात पाच, दहा आणि 20 रुपये प्रतिकिलोच्या दराने भाजीविक्री होत आहे. वाटाणा 10 ते 15 रुपये किलो विकत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून, 50 ते 60 रुपयांत पिशवी भरून भाजीपाला खरेदी करता येत आहे. मात्र, शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात कमालीची निराशा आली आहे.

विदर्भ

नागपूर - ऑक्‍सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे गोरखपूर येथील रुग्णालयात ७० चिमुकले दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर...

09.21 AM

नागपूर - धंतोलीच्या गल्ल्यांमधील ‘ब्लॉकेज’ काढल्यानंतर तशाच पद्धतीचा वापर वाहतूक शाखेतर्फे धरमपेठेत गुरुवारपासून केला जात...

09.18 AM

नागपूर - पाचपावलीतील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि बिर्याणी हॉटेल मालक अब्दुल्ला खान सईमुल्ला खान (वय ५०, रा. नवी वस्ती...

09.18 AM