रूग्णाच्या खर्चाची रक्कम चेकद्वारे स्विकारणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

अकाेला - रूग्णाच्या नातेवाईकांना हाेणारा त्रास लक्षात घेवून अकाेल्यातील डॉक्टरांनी रूग्णाच्या खर्चाची रक्कम चेकद्वारे स्विकारण्याचा निर्णय घेतला असून आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे लेखी पत्र दिले आहे. 

अकाेला - रूग्णाच्या नातेवाईकांना हाेणारा त्रास लक्षात घेवून अकाेल्यातील डॉक्टरांनी रूग्णाच्या खर्चाची रक्कम चेकद्वारे स्विकारण्याचा निर्णय घेतला असून आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे लेखी पत्र दिले आहे. 

हॉस्पीटलचे बील व औषधीखर्च त्यामधुन भागवीणे अशक्य होते. यावर उपाय म्हणून जिल्हा वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्सची संघटना इंडीयन मेडीकल असोसिएशन आकोला यांनी रुग्णाच्या उपचाराचा खर्च चेकने (धनादेशाने) स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारचे निवेदन आज डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची भेट देवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे सुध्दा त्यांनी स्वागत केले. यावेळी इंडीयन मेडीकल असोसिएशन अकोला चे अध्यक्ष डॉ. कैलाश मुरारका यांच्या नेतृत्वात डॉ. जुगल चिराणीया, डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. पराग टापरे, डॉ. रणजीत देशमुख, डॉ. उत्पला मुळावकर, डॉ. आशा निकते, डॉ.महेंद्र काळे, आदिचा समावेश होता. इंडीयन मेडीकल असोसिएशनचे सात मागण्याचे निवेदन पंतप्रधान यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना दिले. 

रुग्णांना सेवा देण्याबद्दल जिल्हयातील डॉक्टर्स जागरुक असुन त्यांचा चेक द्वारे रक्कम स्विकारण्याचा निर्णय स्तृत्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले इंडीयन असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य रुग्णसेवा देण्यासोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी त्यांची प्रशंसा केली. 

विदर्भ

धंतोली झोनने हटविली दुकाने - मांस, चिकन जप्त नागपूर - पोळ्याच्या पाडव्याची संधी साधत अनेकांनी आज रस्त्यांच्या बाजूलाच...

11.00 AM

चौकातील हौदांवर नागरिक संतप्त - ‘सोशल मीडिया’वर काढले महानगरपालिकेचे वाभाडे नागपूर - फक्त सिमेंट रोड केले जात आहेत. सदोष...

11.00 AM

नागपूर - आर्मर्स बिल्डर्सचे संचालक आनंद खोब्रागडे यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये बांधलेल्या बांधकाम प्रकल्पातील फ्लॅटची संयुक्त...

10.51 AM