मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागभूषण पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नागपूर - नागभूषण फाउंडेशनतर्फे दिल्या जाणारा या वर्षीचा नागभूषण पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लक्ष रुपये रोख व सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असा आहे.
 

नागपूर - नागभूषण फाउंडेशनतर्फे दिल्या जाणारा या वर्षीचा नागभूषण पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप 1 लक्ष रुपये रोख व सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असा आहे.
 

नागभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, सचिव गिरीश गांधी यांनी आज नागभूषण पुरस्काराचे घोषणा केली. नागपूर त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त नागभूषण फाउंडेशनचे 2002 मध्ये स्थापना करण्यात आली होती. नागपूरसह विदर्भातील गणमान्य व्यक्तींना त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल नागभूषण पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे 15 वे वर्ष असून, यापूर्वी आर. के. पाटील, नितीन गडकरी, भंते सुरई ससाई, प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे, मारुती चितमपल्ली, महेश एलकुंचवार, राजकुमार हिराण ऍड. व्ही. आर. मनोहर, ठाकूरदास बंग, डॉ. विजय भटकर, डॉ. विकास आमटे आदींना नागभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

विदर्भ

पहिल्याच प्रयत्नात 'रॅम' पूर्ण करणारे पहिले भारतीय नागपूर: नागपूरचे युवा सायलकपटू डॉ. अमित समर्थ यांनी जगातील सर्वात कठिण व...

03.15 PM

नागपूर - ‘रोपे आपल्या दारी’ योजनेचा प्रारंभ रविवारी (ता. २५) फिरत्या स्टॉलला हिरवी झेंडी दाखवून वन सचिव विकास खारगे यांनी केला....

09.24 AM

नागपूर - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अपंग कल्याण आयुक्तालयाद्वारे ‘अ’ श्रेणीत असलेल्या १२३ शाळा व कर्मशाळांना शंभर...

09.24 AM