मुख्यमंत्र्यांच्या योग्य वेळेसाठी संघर्ष यात्रा - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नागपूर - दोन वर्षांत विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे आठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. असे असतानाही मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफीचा विचार करू, असे सांगत आहेत. ती वेळ केव्हा येईल हे सांगता येत नाही. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आणू, असा विश्‍वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

बुधवारी पळसगाव (जि. चंद्रपूर) येथून संघर्ष यात्रेस प्रारंभ झाला. याकरिता अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांतील नेते नागपुरातून रवाना झाले. यावेळी आमदार निवास येथे चव्हाण यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आम्ही सातत्याने आवज उचलत आहोत. आमचे आमदार विधानसभा आणि परिषदेत भांडत आहेत. मात्र, सरकार कुठलीच सकारात्मक भूमिका घेत नाही. मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेऊ, असेच सांगत आहेत. याकरिता सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

विजेची दरवाढ, नापिकी, कर्ज शेतकरी आणि सर्वसामान्यांचे जिणे मुश्‍किल झाले आहे. याकरिता सर्वच विरोधातील राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. त्याचे संघर्ष यात्रेत रूपांतर झाले असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

सेनेने दबाव वाढवावा 
शिवसेनेला संघर्ष यात्रेत सहभागी होण्याची गरज नाही. ते सत्तेत आहेत. त्यांचे अनेक आमदार मंत्री आहेत. सत्तेत राहूनच शेतकऱ्यांना ते कर्जमाफी देऊ शकतात. याकरिता त्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवावा, असेही अशोक चव्हाण म्हणाले. 

Web Title: Chief of the struggle for the right time to travel