साडेतीन लाख टन  तूरखरेदीचा दावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नागपूर -  केंद्राने राज्य सरकारला १ लाख टन तूरखरेदीची मुदतवाढ दिली. त्यानंतर  गेल्या आठ दहा दिवसांत ३ लाख ७९ हजार ९०७  खरेदी नाफेडच्या केंद्रावरून  केल्याचा दावा सरकारने केला आहे. उन्हाळा संपत येत असला तरी उत्पादकांची समस्या कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात तूर कोंडी निर्माण झाली होती. तूरखरेदीवरून सर्वच बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारने २२ एप्रिलपर्यंत केंद्रावर आलेली तूरखरेदी करण्याची भूमिका घेतली. मात्र, त्यानंतरही विदर्भ आणि मराठवाड्यात तब्बल १० लाख  तूर शिल्लक होती. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे २ लाख  तूरखरेदीची परवानगी मागितली.

नागपूर -  केंद्राने राज्य सरकारला १ लाख टन तूरखरेदीची मुदतवाढ दिली. त्यानंतर  गेल्या आठ दहा दिवसांत ३ लाख ७९ हजार ९०७  खरेदी नाफेडच्या केंद्रावरून  केल्याचा दावा सरकारने केला आहे. उन्हाळा संपत येत असला तरी उत्पादकांची समस्या कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात तूर कोंडी निर्माण झाली होती. तूरखरेदीवरून सर्वच बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारने २२ एप्रिलपर्यंत केंद्रावर आलेली तूरखरेदी करण्याची भूमिका घेतली. मात्र, त्यानंतरही विदर्भ आणि मराठवाड्यात तब्बल १० लाख  तूर शिल्लक होती. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे २ लाख  तूरखरेदीची परवानगी मागितली. केंद्राने एक लाख टन तूरखरेदी करण्याची परवानगी दिली. त्यानंतर तूरखरेदीचे आदेश केंद्रापर्यंत पोहोचण्यास आठवडा लागला. गेल्या आठवड्यापासून खरेदीला प्रारंभ झाला. विदर्भातील ४६ केंद्रांवरून नाफेडने २१ मेपर्यंत ३ लाख ७९ हजार ९०७  तूरखरेदी केल्याचा दावा सरकारने केला आहे. तूरखरेदी करताना सरकारने एका शेतकऱ्यांकडून केवळ २५  तूरखरेदी करण्याचा निकष लावला आहे. शिवाय केवळ ३० मेपर्यंतच तूरखरेदी करण्याचे निर्देश सर्व केंद्रांना दिलेत. विदर्भात अजूनही तीन लाख  तूर शिल्लक आहे. खरेदीची मुदत संपण्यास पाच ते सहा दिवसांच्या कालावधी शिल्लक आहे. एवढ्या कमी कालावधीत खरेदी पूर्ण होणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

नाफेडच्या केंद्रावर गर्दी
बाजारपेठेत तुरीचा दर तीन ते साडेतीन हजार रुपयांच्या आसपास आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर ५ हजार ५० रुपये प्रति या हमीभावाने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावर तूरविक्रीसाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.