मुख्यमंत्र्यांना अकोल्यात दाखवले गाजर

योगेश फरपट - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

अकोला - शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा देऊन शेतमालाचे भाव पाडणे,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती,मराठा आरक्षण,मुस्लीम आरक्षण,धनगर आरक्षण या विषयांवर आश्वासने देऊन प्रत्यक्ष कृतीच्या नावावर निवडणूक प्रचारांमध्ये "गाजर" दाखवणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेचे "गाजर" वाटा आंदोलन स्थानीक जनता भाजी बाजारात पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अकोल्यात आले असता सभा मार्गावर हे आंदोलन करण्यात आले. 

20 मिनीट च्या आंदोलनात शेकडो लोकांपर्यंत सरकार च्या पोकळ आश्वासनांचा "गाजर हलवा" या आंदोलनातून पोहोचवण्यात आला.

अवघ्या काही मिनिटांत अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखवले. गनिमी काव्याने पार पडलेल्या या आंदोलनाची आज शहरात सर्वत्र चर्चा आहे.

महानगर पालिका प्रचारासाठी मुख्यमंत्रयाच्यां सभेच्या पार्शवभूमीवर या गाजर आंदोलनाला महत्व प्राप्त झाले.

शेतकऱ्यांच्या व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व समाजवर्गांच्या समस्यांचे समाधान व्हावे,निदान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी आंदोलकांनी केली.

विलास ताथोड, डॉ निलेश पाटील, अविनाश नाकट धनंजय मिश्रा या प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी आंदोलना दरम्यान अटक केली आहे.

Web Title: CM showed normal carrot